दिवसाला फक्त २४ तास ! लोकांचा विचार करायचे सोडून द्या आधी स्वतः चा विचार करायला हवा. आपल्याला स्वतः बद्दल काय माहीत आहे? अज्ञान असणे हा गुन...
दिवसाला फक्त २४ तास !
लोकांचा विचार करायचे सोडून द्या आधी स्वतः चा विचार करायला हवा. आपल्याला स्वतः बद्दल काय माहीत आहे? अज्ञान असणे हा गुन्हा नाही पण शिकण्याची इच्छाच नसणे हे मात्र लाजिरवाणे आहे ! आपण बिझी आहे अस आपण कायम म्हणतो पण असा काय ठोस परिणाम देणारा रणगाडा आपण ओढतोय ? याचा आपण विचार करायला हवा. जगाने आज स्पर्धेचे रूप घेतले आहे बॅलन्स लाईफ जगणे ही एक काळाची गरज आहे अन ती एक कलासुद्धा. जीवन जगणे ही कला आहे हेच मुळात आपल्याला माहीत नसते. उद्या दिवसभरात आपण केंव्हा काय करणार आहोत याचे काही नियोजन आपण करतो का? भूतकाळ आठवत राहतो की भविष्यातच कायम गुंगून जातो. वर्तमानात जगता येणे हे सुखी आयुष्याचे खरे गमक आहे.
एकेमेकांबद्दल मनात अढी, व्यायाम कुणी करतय की नाही हा मोठा प्रश्न आहे. "सर सलामत तो पगडी पचास" या नुसार लोक स्वतः ची सुदधा काळजी घेताना दिसत नाही. युवा पिढी आळशी बनताना आपण पाहतोय. १६ ते २२ ची मुले कामधंदा सोडून टगेगिरी करण्यात मग्न आहे. दिवसाच्या चोवीस तासापैकी एकही तास आपण काही महत्त्वाचे काम केले असेल तर आठवा. आपले आर्थिक नुकसान झाले तरी एक वेळ चालेल पण वाया घालवलेला वेळ आयुष्यात वाईट वेळ घेऊन येतो. उद्याचे कोणी पाहिले आहे पण आज योग्य रीतीने वेळेचा केलेला वापर भविष्यात अनेक आनंद आपल्या आयुष्यात घेऊन येईल.
ज्याला वेळेचे महत्व कळले त्याला जीवनाचे तत्व कळले. मनाशी पक्के ठरवून टाका की येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर वापर करा. २४ तास या वेळेपेक्षा जास्त तास या जगात कुणालाही नाही. तुम्ही सकाळी उठल्यापासून तुमच्या जीवनाच्या अकाऊंट वर हे २४ तास मिळतायत अन तुम्ही ते २४ तास कसे वापरता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही गरीब आहात की श्रीमंत वेळेच्या तराजूत दोघेही सारखेच दिवसाला फक्त २४ तास....गरीब असो वा श्रीमंत हा तुझ्या मनाचा भास.. प्रत्येकाला दिवसाला फक्त २४ तास !
-------------------------------
©®लेखक : अरुण महादेव वाळुंज
मु. पो. पिंपळगाव तुर्क,
ता. पारनेर, जि. अहमदनगर
मो.९६२३८६८३७२