सुपाचे उद्योजक संतोष गायकवाड ६ वर्षापासून वंचितांन बरोबर साजरी करत आहेत दिवाळी .. वासुंदे व खडकवाडीच्या आदिवासींना दिवाळी निमित्ताने मिठाई...
सुपाचे उद्योजक संतोष गायकवाड ६ वर्षापासून वंचितांन बरोबर साजरी करत आहेत दिवाळी
..
वासुंदे व खडकवाडीच्या आदिवासींना दिवाळी निमित्ताने मिठाई वाटप
-----
गायकवाड यांनी सामाजिक उपक्रम राबवत निर्माण केला आदर्श
वासुंदे येथील ठाकरवाडी च्या आदिवासी कुटुंबियांना दिवाळी निमित्ताने मिठाईचे वाटप करताना उद्योजक संतोष गायकवाड यांच्यासह प्रवीण दरेकर, पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, उपाध्यक्ष सनी सोनवणे, कार्यकारणी सदस्य पत्रकार भास्कर पोपळघट, पत्रकार सतीश ठुबे, जोगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर वाबळे, मा. पंचायत समिती सदस्य धोंडीभाऊ मधे
( छाया शरद झावरे पारनेर)
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील सुपा येथील उद्योजक संतोष गायकवाड हे गेल्या ६ वर्षापासून समाजातील वंचित घटकां बरोबर दिवाळी साजरी करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. पारनेर तालुक्यातील वासुंदे व खडकवाडी येथील जवळपास १५० कुटुंबीयांना गुरुवारी दिवाळीच्या सणाला मिठाईचे वाटप करण्यात आले आहे.
सुपा औद्योगिक वसाहतीत आपला उद्योग व्यवसाय सांभाळत उद्योजक संतोष गायकवाड सामाजिक उत्तरदायित्व स्विकारत सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा वासुंदे गावातील दुर्गम भागात असणाऱ्या येथील ठाकरवाडी वरील आदिवासी महिला मुलांना व बांधवांना मिठाईचे वाटप केले आहे. तर दुसरीकडे खडकवाडीच्या जांभुळवाडी येथे आदिवासी समाजातील मोलमजुरी करणाऱ्यांना मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
सुपा येथील ओंकार ग्रॅनाईट&टाईल्स व सहारा प्रतिष्ठाणचे उद्योजक संतोष गायकवाड हे गेल्या
सहा वर्षापासून आपली दिवाळी गोरगरीब आदिवासी व वंचिता समवेत साजरी करत असतात. त्यानुसार आज ( गुरुवारी) पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील ठाकरवाडी ( शिक्री) व खडकवाडी येथील जांभूळवाडीच्या आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी उद्योजक संतोष शेठ गायकवाड यांच्यासह पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे उपाध्यक्ष सनी सोनवणे कार्यकारणी सदस्य पत्रकार भास्कर पोपळघट पत्रकार सतीश टुडे जोगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर शेठ वाबळे प्रविण दरेकर व माजी पंचायत समिती सदस्य धोंडीभाऊ मध्ये नवनाथ केदार बाळासाहेब मध्ये यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित आदिवासी यांनी दिवाळीनिमित्त आम्हाला जी मिठाई भेट दिली आहे त्याबद्दल जांभुळ वडी येथील तरुणांनी फटाके फोडत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर या नाविन्यपूर्ण उपक्रम मुळे आबालवृद्धांच्या चेहऱ्यावरील हास्य दिसून येत होते.