सावरगाव येथे महिलांना साड्या व दिवाळी फराळ वाटप माजी सभापती गंगाराम बेलकर यांचा सामाजिक उपक्रम सर्व सामान्य कुटुंबाची दिवाळी झाली गोड गाव पा...
सावरगाव येथे महिलांना साड्या व दिवाळी फराळ वाटप
माजी सभापती गंगाराम बेलकर यांचा सामाजिक उपक्रम
सर्व सामान्य कुटुंबाची दिवाळी झाली गोड
गाव पातळीवर यापुढे समाजकारण करणार : गंगाराम बेलकर
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सावरगाव येथे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना दीपावली निमित्त पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी १०० पेक्षा जास्त साड्या व दिवाळीच्या फराळाचे वाटप केले. व सर्व सामान्य कुटुंबाची दिवाळी त्यांनी गोड करण्याचा प्रयत्न केला. हा सामाजिक उपक्रम राबवून पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सावरगाव ग्रामस्थांनी स्वागत केले.
दरम्यान या सामाजिक उपक्रमाचे नियोजन गंगाराम बेलकर यांच्या वतीने सावरगाव ग्रामपंचायत व बाराबलुतेदार संघटना तसेच आम्ही सावरगावकर ग्रुप च्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळे सावरगाव येथील अनेक सर्वसामान्य कुटुंबांची दिवाळी यावेळी गोड झाली आहे.
यावेळी सावरगाव येथील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन गावातील जेष्ठ नागरिक व नवनिर्वाचित संघटनांचे पदाधिकारी यांचा यावेळी गंगाराम बेलकर यांनी सन्मान व सत्कार केला.
यावेळी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर बोलताना म्हणाले की दीपावली निमित्त सामान्य कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे भाग्य मला मिळाले. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना या दिवाळीनिमित्त साड्यांचे व दिवाळी फराळाचे वाटप केले हा उपक्रम यापुढे दरवर्षी राबवून सर्वसामान्य गरीब कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा माझा प्रयत्न असेल सावरगाव या ठिकाणी काम करत असताना यापुढे मी सामाजिक कामातून गावच्या विकासासाठी कटिबद्ध असेल. यापुढील काळात स्थानिक पातळीवर कोणतेही राजकारण न करता समाजकारण करत समाजाची सेवा मी करणार आहे असे माजी सभापती गंगाराम बेलकर बोलताना आपल्या भाषणात म्हणाले. तसेच सरपंच परिषदेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक मोहन रोकडे म्हणाले की गंगाराम बेलकर हे नेहमीच सामाजिक कामाच्या माध्यमातून राजकारण करत असतात. उद्योग व्यवसायाच्या व राजकारणाच्या माध्यमातून ते एक कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी गावातील अनेक जेष्ठ नागरिक, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सरपंच परिषदेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक मोहन रोकडे, वडनेर हवेली चे सरपंच लहू भालेकर, प्रदीप गाडे, सरपंच सुरेखाताई मगर, उपसरपंच प्रदीप गुगळे, शंकर गोपने, बाळासाहेब शिरतार, पोपट चिकणे, मंगेश शिंदे, रवींद्र गायखे, बाळासाहेब चिकणे, पर्वती चिकणे, किसन घनदाट, विष्णू माने, संतोष घनदाट, कुंडलिक शेळके, पंकज बेलकर, दिलीप गांजे, रामा साळवे, शांताराम शिंदे, रखमा शिंदे, आनंदा गांजे, बबन चिकणे, सतीश घनदाट, देवराम मगर, प्रकाश चिकणे सुनील तांबोळी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण
माजी पंचायत समितीचे सभापती गंगाराम बेलकर यांनी आजपर्यंत समाजकारणाच्या माध्यमातूनच राजकारण केले आहे. राजकारण करत असताना त्यांनी नेहमी सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवले आहे. दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील व गावातील सर्वसामान्य कुटुंबांची दिवाळी गोड झाली पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून त्यांच्या सावरगाव या ठिकाणी दिवाळी निमित्त सामाजिक उपक्रम घेतला व अनेक सामान्य कुटुंबांची दिवाळी गोड केली आहे.
महिलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद
पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी त्यांच्या गावी सावरगाव या ठिकाणी दिवाळीनिमित्त महिलांना साडी व दिवाळी फराळाचे वाटप केले यावेळी उपस्थित असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर गंगाराम बेलकर यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे आनंद निर्माण झाला होता.
सामाजिक उदात्त हेतूने समाजासाठी काम करणार
दिवाळी निमित्त सामाजिक उपक्रम राबवत गंगाराम आंबेडकर यांनी सावरगाव, कर्जुले हर्या, टाकळी ढोकेश्वर तसेच परिसरामध्ये व पारनेर तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रम प्रसंगी गंगाराम बेलकर बोलताना म्हणाले की समाजात उदात्त हेतू ठेवून व समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवून मी यापुढे काम करणार आहे.
...