पारनेर शहरातील अतिक्रमण पुन्हा काढा व्यवसायिकांच्यावतीने निवेदन पारनेर प्रतिनिधी : गेल्या सहा महिन्यांपूर्वी पारनेर नगरपंचायतीच्या हद्दीत अस...
पारनेर शहरातील अतिक्रमण पुन्हा काढा
व्यवसायिकांच्यावतीने निवेदन
पारनेर प्रतिनिधी :
गेल्या सहा महिन्यांपूर्वी पारनेर नगरपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या पारनेर -अळकुटी चौकापासून ते थेट बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे तहसीलदारांसह नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली होती. परंतु तहसीलदार यांची बदली होताच पारनेर शहरातील नगरपंचायती हद्दीत ही अतिक्रमणे पुर्ववत झाली असून ही अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावी अशी लेखी मागणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्याकडे व्यावसायिकांनी केली आहे.
पारनेर शहरातील वेशीजवळ व मारुती मंदिरासमोर अनेक छोटे मोठे व्यावसायिक आपली दुकाने मांडून व्यवसाय करीत असतात. त्यामुळे चारचाकी, दुचाकी चालकासह बाहेरून येणाऱ्या इतर नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावी, अशी मागणी पारनेर शहरातील स्थानिक व्यवसायिकांनी नगरपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर भाऊसाहेब खेडेकर यांच्यासह पै. युवराज दिवटे, अखिलभाई शेख, योगेश मांडगे, रामचंद्र गायकवाड, संतोष काळे, बाळासाहेब चेडे यांच्या सह्या आहेत.