शिवरस्त्यांसाठी सरकारने निधी द्यावा : झावरे सुप्रिया अमोल साळवे यांच्या पंचायत समिती विकास निधीतून रस्त्याचे भूमिपूज पारनेर प्रतिनिधी : श...
शिवरस्त्यांसाठी सरकारने निधी द्यावा : झावरे
सुप्रिया अमोल साळवे यांच्या पंचायत समिती विकास निधीतून रस्त्याचे भूमिपूज
पारनेर प्रतिनिधी :
शिवार रस्ते तसेच पानंद रस्त्यांसाठी केवळ घोषणा न करता सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवृत्त अभियंता नारायण झावरे साहेब यांनी केली आहे.पंचायत समिती सदस्या सौ.सुप्रियाताई अमोल साळवे यांच्या विशेष प्रयत्नातून व पंचायत समिती स्तर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून टाकळी ढोकेश्वर गावातील पानस वस्ती, पायमोडे वस्ती रोड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,ग्रामीण भागातील शेतकरी मुख्यतः आपल्या शेतात वस्ती करून राहतात.या शेतात जाणे-येण्यासाठी कच्चे रस्ते असतात.
पावसाळ्यात हे रस्ते पाण्याने वाहून जातात त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात याच ओबडधोबड रस्त्यांवरून शेतकऱ्यांना वाहतूक करावी लागते. अनेकदा ट्रक्टरसारखी वाहने या रस्त्यामध्ये खचतात कधी कधी तर खड्यात जाऊन पलटी देखील होतात. चांगले रस्ते नसल्याने शेतक-यांना शेतात पिकवलेला शेतमाल ब-याचदा बाजारपेठेत नेता येत नाही त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.सरकारने शिवार रस्ते, शिवरस्ते तसेच पानंद रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे किमान सर्वच रस्त्यांचे मुरमीकरण तसेच खडीकरण करणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमासाठी सदस्य अमोल साळवे ,मा.सरपंच शिवाजीराव खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण सर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश शिंदे,ग्रा.सदस्य बापुसाहेब रांधवन,दत्तात्रय निवडुंगे, किसनराव धुमाळ,मोहन रोकडे, बाळासाहेब इघे सर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्ग व पायमोडे वस्ती,पाणस वस्ती,गुंजाळ वस्ती ,उंडे वस्ती यांना जोडणाऱ्या या रस्ता दुरुस्ती-मुरूमीकरणाचे चे काम होत असल्यामुळे स्थानीक ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त करुन आभार मानले.
COMMENTS