संघटन कौशल्याचे राष्ट्रवादीचे खरेखुरे शिलेदार नवनाथ गांजे नवनाथ गांजे वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष गणेश जगदाळे/पारनेर शरदचंद्रजी पवार साहेब यां...
संघटन कौशल्याचे राष्ट्रवादीचे खरेखुरे शिलेदार नवनाथ गांजे
नवनाथ गांजे वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष
गणेश जगदाळे/पारनेर
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन पारनेर तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक-राजकीय क्षेत्रामध्ये अविरतपणे सेवा करत असलेले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेलचे पारनेर तालुका उपाध्यक्ष नवनाथभाऊ गांजे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीसाठी आपल्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून काम करत आहे. राष्ट्रवादी मध्ये काम करत असताना नवनाथ गांजे यांनी राष्ट्रवादीचे पुरोगामी विचार सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आत्तापर्यंत प्रयत्न केलेले आहेत. आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्यात काम करत असताना त्यांनी राष्ट्रवादी संघटना नक्कीच वाढवली आहे. ओबीसी समाजाचे नेतृत्व करत असताना ओबीसींचे प्रश्न त्यांनी समाज माध्यमांमधून वेळोवेळी मांडले आहेत.
सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सर्वसमावेशक भूमिका घेऊन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष नवनाथ गांजे हे पूर्ण पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम करत आहेत.
पारनेर तालुक्यातील सावरगाव सारख्या ग्रामीण भागातून नेतृत्व करत असताना राष्ट्रवादी ही त्यांनी ग्रामीण भागामध्ये वाढवली असून राष्ट्रवादीचे मोठी युवकांची फळी त्यांच्यासोबत काम करत आहे.
नवनाथ गांजे या शरद पवार साहेब यांच्या सच्च्या मावळ्याचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त नवनाथ भाऊ गांजे यांना तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या गणातून त्यांना जर पक्षाने एक जुना पदाधिकारी म्हणून निवडणूक लढण्याची संधी दिल्यास एक सर्वसमावेशक संयमी सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ते पुढे येतील व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करत असताना त्यांना काम करण्याची अजून ताकद मिळेल.
आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून
पारनेर तालुक्यात नवनाथ गांजे संघटन वाढीसाठी चांगला प्रयत्न करत आहेत आमदार निलेश लंके यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून नवनाथ गांजे तालुक्यात सध्या ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून आज पारनेर तालुक्यातील उत्तर संघटना वाढीसाठी मदत होत आहे. आमदार निलेश लंके साहेब यांच्या माध्यमातून नवनाथ गांजे उत्तम काम पक्षामध्ये आज करत आहेत.