सैनिक फौंडेशनची ढोकेश्वर विद्यालयास विकासकामांसाठी मदत. फौंडेशनची सामाजिक बांधिलकी इतरांसाठी मार्गदर्शक. टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यात...
सैनिक फौंडेशनची ढोकेश्वर विद्यालयास विकासकामांसाठी मदत.
फौंडेशनची सामाजिक बांधिलकी इतरांसाठी मार्गदर्शक.
टाकळी ढोकेश्वर :
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर सैनिक फौंडेशनच्या वतीने ढोकेश्वर विद्यालयात सुरु असलेल्या विविध विकासकामांसाठी एकविस हजार रुपयांची मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश फौंडेशनचे जेष्ठ मार्गदर्शक बबननाना खिलारी यांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जावळे यांच्याकडे देण्यात आला यावेळी ढोकेश्वर सैनिक फौंडेशनचे अध्यक्ष दिगंबर शेळके,सदस्य संजय खिलारी, ज्ञानदेव पायमोडे,शिवाजी ढुस,गणेश बांडे आदी उपस्थित होते.
सैनिक फौंडेशनच्या वतीने या अगोदरही सामाजिक बांधिलकी जपत जि.प. शाळा स्वच्छता,विद्यार्थ्यांना मदत,आम्ही टाकळीकरच्या विविध विकासकामांसाठी सक्रीय मदत करीत आहे तसेच टाकळी ढोकेश्वर व परीसरात नेहमीच विविध उपक्रम राबवित आहे.फौंडेशनचे सर्व सदस्य ढोकेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी असुन विद्यालयाशी असलेल्या ऋणानुबंधाने ही मदत करण्यात आली आहे.आजी-माजी सैनिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ढोकेश्वर सैनिक फौंडेशनची स्थापन करण्यात आली होती त्याचबरोबर सामाजिक कार्यासाठी फौंडेशन नेहमीच अग्रेसर असल्याचे अध्यक्ष दिगंबर शेळके यांनी सांगितले.
ढोकेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात
माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू असुन इतरही
कामे सुरू असल्याचे मुख्याध्यापक जावळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी ढोकेश्वर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय हराळ,शिक्षक सर्वश्री बाळासाहेब निवडुंगे, मल्हारी वाघस्कर,विजय सोबले, अमोल ठाणगे,राहुल झावरे, नारायण शेळके तसेच शिक्षिका श्रीमती सुमन वाळुंज, शोभा गायकवाड, सोनल रोहकले,सुरेखा ठाणगे, प्रिया डव्हणे,वर्षा शेळके ,मंजुषा शिंदे आदी उपस्थित होते.