पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहा; विश्वनाथ कोरडे याचे सुपा येथे प्रतिपादन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण पारनेर/प्रतिनिधी : पर्य...
पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहा;
विश्वनाथ कोरडे याचे सुपा येथे प्रतिपादन
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
पारनेर/प्रतिनिधी :
पर्यावरण वाचवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास होईल, अशा कोणत्याच गोष्टी आपण न करता सूर्य, वारा यापासून ऊर्जास्रोत निर्मितीवर भर द्यावा, असे प्रतिपादन विश्वनाथ कोरडे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील सुपा येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सागर भास्करराव मैड यांच्या माध्यमातून पर्यावरण सप्ताहानिमित्त पर्यावरण चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कोरडे हे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे, सुपा उपसरपंच सागर मैड, जेष्ठ पत्रकार मार्तंडराव बुचडे, अप्पासाहेब गोपाळे, किशोर गोपाळे, नाजीम शेख, शुभम शिंदे, नितीन तवले, सुरज काळे, शुभम चितळकर, सचिन मोहिते, योगेश भालेकर, ओमकार मावळे यांच्यासह प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
सागर भास्कराव मैड यांच्या माध्यमातून सुपा व सुपा परिसरात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत असतात. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी लहान गट व मोठा गट प्रथम व्दितीय व तृतीय असे नंबर काढण्यात आले व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. दोन वर्ष शाळा बंद असल्याकारणाने विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होताच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य पहावयास मिळाले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.