विकास कामांच्या जोरावर माझे राजकारण : सुजित झावरे पाटील हिवरे कोरडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण पारनेर प्रतिनिधी : हिवरे कोरड...
विकास कामांच्या जोरावर माझे राजकारण : सुजित झावरे पाटील
हिवरे कोरडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण
पारनेर प्रतिनिधी :
हिवरे कोरडा येथील सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून ७५.०० लक्ष रु. मंजूर करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण सुजित झावरे पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
आजपर्यंत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. आज हिवरेकोरडा सारख्या गावात उपकेंद्र इमारत उपलब्ध झाल्याने कोरोना कालावधीत गावामध्ये पहिल्या टप्प्यातील १००% तसेच दुसऱ्या टप्प्यातील ५०% लसीकरण झाले आहे. सदर इमारत उपलब्ध झाल्याने हिवरेकोरडा, काळकूप, माळकूप, पाडळी तर्फे कान्हूर या परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
विकास कामाच्या जोरावर आपल्याला तीन वेळा वेगवेगळ्या गटातून मतदारांनी निवडून दिले आहे. आज मला खूप आनंद होत आहे हिवरेकोरडा सारख्या गावातील ग्रामस्थ राजकीय हेवेदावे विसरून विकास कामांसाठी सर्व लोक एकत्र येतात ही बाब उल्लेखनीय आहे. यावेळी गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत उपलब्ध करून दिलेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सुजित झावरे पाटील यांचे नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबासाहेब खिलारी, अरूणराव ठाणगे, किसनराव धुमाळ, मोहनराव रोकडे, शिवाजी खोडदे, सरपंच सौ.उज्वला कोरडे, उपसरपंच सपना अडसूळ, चेअरमन बाळासाहेब कोरडे, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कोरडे, मा चेअरमन जयसिंग कोरडे, मा.सरपंच विलास कोरडे, मा.सरपंच प्रकाश कोरडे, रामचंद्र अडसूळ,मा बाबू (वकील) कोरडे, डॉ.श्रद्धा अडसूळ, अंबादास वाळुंज, सुदाम कोरडे, विठ्ठलराव अडसूळ, बबन अडसूळ, शशिकांत अडसूळ, बबन वाळुंज, सबाजी शेरकर, साहेबराव नरसाळे, नंदकुमार कदम, संतोष जहृड, गोरख शिंदे, रघुनाथ साळवे, रवींद्र घंगाळे, भाऊशेठ गोळे, अनिल चौधरी, अनिल कोरडे, राजेंद्र अडसूळ, तेजस अडसूळ, बाळासाहेब अडसूळ, अमोल अडसूळ, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ.सरदार प्रतीक, आरोग्य कर्मचारी वर्ग, ठेकेदार नागेश रोहोकले, अतुल रोहोकले तसेच महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.