ग्रामविकासासाठी गावातील नागरिकांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज ! किन्ही येथे भास्करराव पेरे पाटील यांचे प्रतिपादन ! पारनेर / प्रतिनिधी...
ग्रामविकासासाठी गावातील नागरिकांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज !
किन्ही येथे भास्करराव पेरे पाटील यांचे प्रतिपादन !
पारनेर / प्रतिनिधी :-
गावचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर गावातील नागरिकांनी सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. या पुढे आपल्या समस्या आपल्यालाच सोडाव्या लागणार असुन , यासाठी ग्रामपंचायतींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे.ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायांची उभारणी केली पाहिजे , फळझाडांची लागवड केली पाहिजे ; जेणेकरून या सर्वांमधुन मिळणारा पैसा गावच्या विकासासाठी खर्च करता येऊ शकतो तसेच नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्वांनी शौचालये बांधली पाहिजेत व त्याचा नियमित वापर देखील केला पाहिजे असे प्रतिपादन आदर्शगाव पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी रविवारी किन्ही येथे पार पडलेल्या विविध विकासकामांच्या भुमिपुजन व लोकार्पण सोहळ्यादरम्यान केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर , पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेशराव शेळके , उद्योजक नानासाहेब खोडदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य आझादराव ठुबे हे होते.किन्ही येथे जि.प.चे सभापती काशिनाथ दाते सर व जि.प.सदस्या सौ.उज्ज्वला ठुबे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून नूतन प्राथमिक शाळा खोल्यांचे भुमिपूजन व जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला. या वेळी बोलताना दाते सर म्हणाले की , राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी , काँग्रेस या तिनं पक्षांचं सरकार स्थापन झाल्याने अहमदनगर जिल्हा परिषदेत देखील हे तिन्ही पक्ष एकञ आले व त्यामुळेच आपल्याला जि.परिषदेत सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
मिळालेल्या संधीचे मी देखील सोनं केलं असुन , पारनेर तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे या पदाच्या माध्यमातून आपल्याला करता आल्याचे एक वेगळं समाधान वाटते आहे. या कार्यक्रमादरम्यान गावातील विविध क्षेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या भुमिपुञांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या वेळी नाशिक जिल्हा वन परिक्षेञ अधिकारी यशवंत केसकर , उद्योजक भास्कर खोडदे , उपाभियंता चंद्रकांत मुळे , बाबाजी गोरे सर , प्रा.शिवाजी मुळे सर , डॉ.लक्ष्मण खोडदे ,
सरपंच पुष्पा खोडदे , उपसरपंच हरेराम तथा मिठू खोडदे , ग्रामसेवक संजय घोलप , माजी सरपंच मानसिंग देशमुख , माजी मंडलाधिकारी प्रभाकर खोडदे , रावसाहेब किनकर , माजी चेअरमन जयराम खोडदे , माजी चेअरमन अरविंद खोडदे , माजी चेअरमन राजेंद्र मुळे , श्रिमंत किनकर , प्रा सचिन मोढवे सर , विकास ठाणगे सर , राहुल खोडदे , ग्रामपंचायत सदस्य संदिप गोरे , संतोष खरात , जयश्री खोडदे , नंदा परांडे , अश्विनी व्यवहारे , गुलाब खोडदे , तानाजी साकुरे , पाटिलबा खोडदे मेजर , भानुदास खोडदे , दिलीप खोडदे , आनंदराव खोडदे , शिवाजी खोडदे , किरण खोडदे ,
शरद व्यवहारे , अमोल खोडदे , संपत खोडदे , संग्राम खोडदे , जयसिंग मोढवे , बाळासाहेब खेसे , पांडुरंग व्यवहारे , बापु व्यवहारे , संतोष खोडदे ,अशोक किनकर , भिकाजी आरेकर व गावातील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन राजेंद्र खोडदे सर यांनी केले तर प्रास्ताविक उपसरपंच हरेराम तथा मिठू खोडदे यांनी केले.आभार उद्योजक नानासाहेब खोडदे यांनी मानले.
COMMENTS