नवोदय विद्यालयात आणखी ९ कोरोनाबाधित आतापर्यंत तब्बल ९२ विद्यार्थ्यांना बाधा टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर न...
नवोदय विद्यालयात आणखी ९ कोरोनाबाधित
आतापर्यंत तब्बल ९२ विद्यार्थ्यांना बाधा
टाकळी ढोकेश्वर :
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात मंगळवारी सायंकाळी पुन्हा ९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळले. त्यामुळे आता नवोदय विद्यालयातील एकुण कोरोना बाधितांची संख्या ९२ वर पोहोचली आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय हे निवासी विद्यालय असून मागील आठवड्यात शुक्रवारी ९ कोरोनाबाधित आढळून आले होते. तर शनिवारी १० कोरोनाबाधित विद्यार्थी व शिक्षक आढळून आले आहे. तर रविवारी सकाळी ३३ व सायंकाळी १९ कोरोना बाधित आढळून आले तसेच सोमवारी सायंकाळी १२ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले आहे. आज मंगळवारी सायंकाळी अजून ९ कोरोना बाधीत आढळले. सर्व कोरोना बाधीत विद्यार्थ्यांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. विद्यालयातील जवळपास सर्वच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तपासणी पुर्ण झाल्या आहेत त्यामुळे आज केवळ २ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
नवोदय विद्यालय प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याने प्रवेशासाठी पूर्णपणे बंदी घातली आहे. कोरोना बाधितांचा आकडा रोजच वाढत असल्याने पालकांची चिंता वाढलेली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिश लोंढे हे परीस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
COMMENTS