सामाजिक यज्ञातील उर्जेचा वाढदिवस! निलेश लंके प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी सर पारनेर/प्रतिनिधी : काही व्यक्ती या...
सामाजिक यज्ञातील उर्जेचा वाढदिवस!
निलेश लंके प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी सर
पारनेर/प्रतिनिधी :
काही व्यक्ती या अशा असतात की, कितीही खडतर प्रवास असला तरी हार न मानता मार्गक्रमण करीत राहतात. यशापयशाची परवा ते कधीच करत नाहीत. फक्त आपले उद्दिष्ट ध्येयाशी प्रामाणिक राहून काम करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो. त्यापैकी बाळासाहेब खिलारी हे एक नाव मला अधिक भावते. आव्हानाना समोर आव्हान म्हणून कोण उभे राहत असेल तर ते खिलारी सर, पारनेर तालुक्याच्या राजकीय व समाजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून हे नाव कायम राहिलेले आहे. सामाजिक यज्ञामध्ये कायम पुढाकार घेणे, आणि जीव ओतून काम करणे ही त्यांची वेगळी ओळख होय. माजी आमदार स्वर्गीय वसंत दादा झावरे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून बाळासाहेब खिलारी सर्व परिचित होते. आमदार निलेशजी लंके यांचे कट्टर समर्थक सर आहेत.
आमदार साहेबांच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये खिलारी सर यांचे योगदान राहिलेले आहे. मग ते टाळे बंदीच्या काळात लाखो वाटसरूंसाठी सुरु केले अन्नछत्र असेल किंवा टाकळी ढोकेश्वर आणि कर्जुले हर्या सिमेवरी एक हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर असेल सरांनी त्यासाठी खूप परिश्रम घेतले. भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालय दुसऱ्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिरात हजारो रुग्णांना बरे करण्यामध्ये आमदार निलेशजी लंके यांना यश मिळाले. त्याठिकाणीही बाळासाहेब खिलारी यांनी रात्रंदिवस काम केले. त्यांनी कोरोना रुग्णांची मनोभावे सेवा केली. आमदार महोदयांचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली.
लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटरची महती सर्वदूर पोहोचली. देश विदेशात या उपक्रमाचे कौतुक झाले . त्यासाठी पंगती पासून ते गाव पहारे याचे उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात आले. बाळासाहेब खिलारी सरांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा होता. मला आमदार निलेश जी लंके यांच्याकडून उर्जा , प्रोत्साहन , पाठबळ नेहमीच मिळते. असे सर अत्यंत प्रांजळपणे सांगतात. आमदार साहेबांनी फक्त लढ असे सांगितल्यानंतर काम करण्यासाठी शंभर हत्तींचे बळ मिळते असेही ते म्हणतात. म्हणजे आमदार निलेशजी लंके यांच्याशी अत्यंत एकरुप झालेला कार्यकर्ता म्हणजे खिलारी सर होय! निलेश लंके प्रतिष्ठान चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. शिक्षक नेता म्हणून सुद्धा बाळासाहेब यांची वेगळी ओळख आहे.
आणि राज्यातील चंदन उत्पादक शेतकऱ्यांचे ते नेतृत्व करीत आहेत. सरांच्या सौभाग्यवती या टाकळी ढोकेश्वर च्या सरपंच आहेत. सर हे माझे अत्यंत जवळचे ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र आहेत. पारनेर, आमदार निलेशजी लंके आणि बाळासाहेब खिलारी हे माझ्या आयुष्यातलं अत्यंत हृदय स्पर्शी समीकरण बनलेले आहे. आज त्यामधील एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच सरांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा.
---- नाना करंजुले