पारनेर नगरपंचायत काँग्रेस पूर्ण ताकतीने लढणार : आ. लहू कानडे काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा पारनेर : राज्यामध्ये ...
पारनेर नगरपंचायत काँग्रेस पूर्ण ताकतीने लढणार : आ. लहू कानडे
काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा
पारनेर :
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. परंतु ग्रामीण परीस्थिती वेगळी आहे. एक काळ देशामध्ये राज्यामध्ये फक्त काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी जे पक्षाचे गतवैभव होते. ते परत मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आम्ही पारनेर नगरपंचायतमधे काँग्रेसचे सर्वच्या सर्व १७ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. असे आ. लहू कानडे म्हणाले.
पारनेर तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने पारनेरमधील आंबेडकर भवन येथे नगर पंचायत निवडणुकी संदर्भातील
भूमिका ठरविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आ. लहु कानडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके हे उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, तालुक्यामध्ये विधानसभेला काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण मदत केली आणि पारनेरचे आ. निवडून दिले. त्यावेळी काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले आहे. आता नगरपंचायत निवडणूक आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दोन पावले मागे येऊन काँग्रेस पक्षासोबत सन्मानपूर्वक आघाडी करावी, अशी मागणी कार्यकत्यांनी केली.
काँग्रेसची तालुक्यात ताकत कमी असली तरी ती वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही सुध्दा प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आघाडीची भूमिका काँग्रेसचे नेते, प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ठरवतील. त्यानुसार निर्णय घेऊ. आघाडी झाली तर पक्षाच्या भूमिकेनुसार काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतील. नाही तर काँग्रेस पक्ष पारनेर नगरपंचायतमध्ये सर्वच्यासर्व १७ प्रभागां मध्ये निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागण्याचे आदेशही आ. लहू कानडे यांनी दिले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी दादा चौधरी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठलराव देठे,
तात्यासाहेब ढेरे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर कडू, तालुका महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा मनिषा ठुबे, किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देठे, तालुका उपाध्यक्ष शाम ठाणगे, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष अक्षयराज गायकवाड, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता डेंगळे, चेअरमन दिलीप मदगे, तालुका आत्मा कमिटी सदस्य सिताराम देठे, संजय गांधी निराधार योजना सदस्य विकास साळवे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS