पाथरी येथे ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे : राजन क्षिरसागर ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची आक्रमक भ...
पाथरी येथे ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे : राजन क्षिरसागर
ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची आक्रमक भूमिका
पाथरी विशेष प्रतिनिधी :
ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा यांच्या वतीने पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी रेणुका शुगर्स, पाथरी जिल्हा परभणी या कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी तसेच
१००% ऊस गाळपाची हमी द्या, रेणुका शुगर्स पाथरी कारखान्याची गाळप क्षमता १०००० मेट्रिक टन पर्यंत वाढवा, सर्व साखर कारखान्यांकडील थकीत FRP अदा करा, FRP दरात वाढ करा, साखर रिकवरीची चोरी बंद करून सर्व साखर कारखान्याच्या वजन काट्यातील घोटाळे दूर करा, सर्व साखर कारखान्याच्या उप उत्पादनातील नफ्याचा रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार अधिक लाभ ऊस उत्पादकांना द्या, थकीत पीकविमा अदा करा, जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याची दुरुस्ती करा
या प्रमुख मागण्यांसाठी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पाथरी येथील सेलू कॉनर येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्तारोको आंदोलन करण्यात आले या ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश बघून सरकारने देखील दखल घेत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची ग्वाही दिली. आंदोलन स्थळावरून कॉम्रेड राजन क्षीरसागर सर शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आता गरजेचे आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अन्यथा आक्रमक भूमिका घेणार
या रास्ता रोकोसाठी पाथरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. यावेळी कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे, कॉम्रेड नारायण दळवे, नितिन कुटे , तुकाराम शिंदे, कॉम्रेड सुधीर कोल्हे, विश्वनाथ आण्णा थोरे, ओमजी नखाते, कॉम्रेड मुंजा लिपणे, कॉम्रेड ओमकार पवार, कॉम्रेड राम मोरे, कॉम्रेड मितेश सुक्रे , कॉम्रेड नवनाथ कोल्हे, सुरेश नखाते आदी उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.