राणीताई लंके यांच्या प्रयत्नातून २० बंधाऱ्यांसाठी ३ कोटी निधी मंजूर राणीताई लंके जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामांना देत आहे...
राणीताई लंके यांच्या प्रयत्नातून २० बंधाऱ्यांसाठी ३ कोटी निधी मंजूर
राणीताई लंके जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामांना देत आहेत गती
पारनेर प्रतिनिधी :
विविध गावांसाठी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या प्रयत्नांतून २० सिमेट बंधाऱ्यांच्या कामासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयातून स्वीय सहाय्यक संदीप चौधरी यांनी दिली.
तालुक्यातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यासाठी विविध ठिकाणी जलाशय निर्माण करून शेतकऱ्यांना बागायती करता येईल व त्या माध्यमातून शेतकरी सुखी होईल. यासाठी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सिमेंट बंधारे राबवण्याचा संकल्प आमदार नीलेश लंके यांनी केला. यानुसार तीन कोटी रुपयांच्या २० सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली.
मंजूर बंधारे गटेवाडी (ता. पारनेर) आंब्याचा ओढा सिमेंट बंधारा १५ लाख, वडनेर हवेली (ता. पारनेर) हारदे मळा सिमेंट बंधारा १५ लाख, हंगा (ता. पारनेर) साठे वस्ती सिमेंट बंधारा १५ लाख, शहाजापूर (ता. पारनेर) संगमाचा डोह सिमेंट बंधारा १५ लाख, नारायण गव्हाण (ता. पारनेर) शेळके मळा सिमेंट बंधारा १५ लाख, नारायण गव्हाण (ता. पारनेर) रानमळा सिमेंट बंधारा १५ लाख, नारायण गव्हाण (ता. पारनेर) नागझरी सिमेंट बंधारा १५ लाख, पळवे बुद्रुक (ता. पारनेर) म्हसोबा डोह सिमेंट बंधारा २० लाख, पाडळी रांजणगाव (ता. पारनेर) यलदरावस्ती सिमेंट बंधारा १० लाख, पाडळी रांजणगाव (ता. पारनेर) मळाईवस्ती सिमेंट बंधारा १५ लाख, अस्तगाव (ता. पारनेर) हडोळावस्ती सिमेंट बंधारा १५ लाख,
रूईछत्रपती (ता. पारनेर) दिवटे मळा सिमेंट बंधारा १५ लाख, वाळवणे (ता. पारनेर) शेरीदरा सिमेंट बंधारा १५ लाख, राळेगणसिद्धी (ता. पारनेर) मापारीदरा सिमेंट बंधारा १५ लाख, यादववाडी (ता. पारनेर) यादववस्ती सिमेंट बंधारा १५ लाख, बाबुर्डी (ता. पारनेर) वनीमळा सिमेंट बंधारा १५ लाख, म्हसणे-सुलतानपूर (ता. पारनेर) पाचमन ओढा सिमेंट बंधारा १५ लाख, निघोज (ता. पारनेर) चेडे वस्ती सिमेंट बंधारा १५ लाख, लोणी मावळा (ता. पारनेर) शेळके मळा सिमेंट बंधारा १५ लाख, पावळ (ता. पारनेर) गोरडे मळा सिमेंट बंधारा १५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.