राष्ट्रवादीच्या रिक्त मंत्रिपदावर जागेवर कोणाची वर्णी लागणार? आ.निलेश लंके की आ.रोहित पवार? राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारावरून आमदार रोहित प...
राष्ट्रवादीच्या रिक्त मंत्रिपदावर जागेवर कोणाची वर्णी लागणार? आ.निलेश लंके की आ.रोहित पवार?
राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारावरून आमदार रोहित पवार व नीलेश लंके यांच्या नावाची चर्चा
पारनेर प्रतिनिधी :
राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक कॅबिनेट मंत्रीपद रिक्त आहे. रिक्त जागेवर राष्ट्रवादीच्या एका तरुण चेहर्यांना संधी मिळावी अशी राष्ट्रवादीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दोन आमदारांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामध्ये नगर -पारनेरचे आमदार निलेश लंके व कर्जत-जामखेड आमदार रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सध्या समाज माध्यमात होत आहे.
आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याची दखल राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर घेतली गेली आणि त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्यातील आर.आर. पाटील अशी प्रतिमा देखील त्यांची बनली आहे.साधी राहणी आणि चांगले काम या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा भविष्यातील सामान्य चेहरा आमदार निलेश लंके बनू शकतात तसेच त्यांच्या पाठीमागे मोठे जनमतही आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार या रिक्त जागेवर होऊ शकतो मात्र यासाठी त्यांना डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद देण्यापेक्षा राज्यमंत्रीपद सुरुवातीला संधी देऊन राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्याची चर्चादेखील समाज माध्यमात आहे.
तसेच कर्जत-जामखेडचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी गेल्या दोन वर्षांत त्यांच्या मतदारसंघात चांगले काम केले आहे. सोबतच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांतील विविध कार्यक्रमांमध्ये सातत्याने हजेरी लावत आहेत त्यामुळे त्यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. तसेच ते केवळ पवार घराण्यातील आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये त्यांची कार्यक्षमता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे नेण्याची आहे अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.
या दोघातील नेमकी कोणाची वर्णी मंत्रिपदासाठी लागते हे हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर नक्कीच समजणार आहे.आपल्याला नेमके काय वाटते या दोन्ही त्यापैकी कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळाली की यापेक्षा आणखी कोणता नेता या मंत्रिपदासाठी पात्र आहे ते आपण आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवू शकता
COMMENTS