पारनेर तालुका कवी मंचाच्या वतीने राज्यस्तरीय काव्यस्पर्धा ३ जानेवारी रोजी टाकळी ढोकेश्वर येथे कार्यक्रम पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुका ...
पारनेर तालुका कवी मंचाच्या वतीने राज्यस्तरीय काव्यस्पर्धा
३ जानेवारी रोजी टाकळी ढोकेश्वर येथे कार्यक्रम
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुका कवी मंच आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर महाविद्यालय, टाकळी ढोकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून नावनोंदणी सुरु असून, जास्तीत जास्त नवोदित कवींनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन पारनेर तालुका कवी मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सहभागी प्रत्येक स्पर्धकास सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
तसेच, सालाबादप्रमाणे कै. रावसाहेब अण्णा ठुबे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पारनेर साहित्यरत्न पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात येणार असून, यावर्षीचा पारनेर साहित्यरत्न पुरस्कार प्रा. संजय पठाडे सर यांना जाहीर करण्यात आला आहे . दि. ३ जानेवारी रोजी पदमभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असणार आहेत. याचवेळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांनाही सन्मानित केले जाईल. पारितोषीकांसाठी डॉ. भाऊसाहेब खिलारी, भाऊसाहेब गवळी, प्रवीण ठुबे, गणेश तांबे, चंद्रभान ठुबे, विक्रम झावरे, किरण तराळ यांचे सौजन्य असणार आहे .
टाकळी ढोकेश्वर येथे हा काव्य महोत्सव रंगणार असून, ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी संकेत ठाणगे मो. नं. ७५५९२७६४४८
या क्रमांकावर संपर्क साधावा.
तालुक्यातील तमाम साहित्यरसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती पारनेर तालुका कवी मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.