डॉ. श्रीकांत पठारे यांचा वाढदिवसा निमित सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धा'चे पारनेर तालुक्यात आयोजन पारन...
डॉ. श्रीकांत पठारे यांचा वाढदिवसा निमित सामाजिक उपक्रम
सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धा'चे पारनेर तालुक्यात आयोजन
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याचे सुसंस्कृत सुशिक्षित आशादायी युवा नेतृत्व म्हणून समोर येत असलेले पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांचा वाढदिवस दि.१९ डिसेंबर रोजी तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.
डॉ. श्रीकांत पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून डॉ. श्रीकांत पठारे हे एक सामाजिक नेतृत्व असल्याने त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवण्यात तालुक्यात साजरा करण्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे. तालुक्यातील पठारवाडी येथे भैरवनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .
तसेच जवळा या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मराठमोळा लोककला यावेळी साजरा करण्यात येणार आहे तसेच तालुक्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे पानोली, वडुले, पिंपळनेर, सांगवी सूर्या, गांजीभोयरे, हतलखिंडी, पठारवाडी, जवळा, गडदवाडी, सिद्धेश्वरवाडी, देवीभोयरे, चिंचोली, गांजेवाडी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अस्थीरोग, स्रीरोग, हृदयरोग, मधुमेह, दमा, मुळव्याध, भंगदर, कान-नाक-घसा यांचे विकार, पोटाचे विकार, इत्यादी आजारांची तपासणी मोफत केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
COMMENTS