वेब टीम : पणजी गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली ...
वेब टीम : पणजी
गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आघाडीवर असून पक्षानेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करण्याची घोषणा केली आहे.
त्यांनी आपलेच पुत्र भाजप (BJP) नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसनेही पर्ये मतदारसंघातून तिकीट जाहीर केले आहे.
राणे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा आणि आपल्याच मुलाला पक्षाने तिकीट दिल्याने गोवा विधानसभा निवडणुकीची धुरा सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांना मोठा धक्का मानला जात आहे.
कारण, फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून प्रतापसिंह राणे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी फडणवीस यांनी प्रतापसिंह राणे यांच्या फार्म हाऊसवर रात्रभोजन केले होते. फडणवीसांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’ मधून भाजपला अनेक गोष्टींचा लाभ होईल, असा अंदाज होता.
त्यानंतरच प्रतापसिंह राणे भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत राणेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
मात्र आता पुत्राविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करून राणे यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. “काँग्रेसचे पदाधिकारी आणि हितचिंतकांनी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विनंती केली आहे. पर्ये मतदारसंघातून मी काँग्रेसकडून निवडणूक लढावी, असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे निवडणूक लढणार आहे.” असे राणे म्हणाले.