वेब टीम : मुंबई ओमायक्रॉन वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आज 30 डिसेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत मुंबईत कलम 144 लाण्यात...
ओमायक्रॉन वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आज 30 डिसेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत मुंबईत कलम 144 लाण्यात आले आहे.
मोकळ्या आणि बंद ठिकाणीही पार्ट्यांवर बंदी असेल त्यामुळे न्यू इयर सेलिब्रेशन साठी रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार, पब्स, रिसॉर्ट्स आणि क्लब मध्येही लोकांना एकत्र जमता येणार नाही.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत आजपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
COMMENTS