वेब टीम : अहमदनगर राज्यात आता कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. राज्यातली अनेक मंत्री तसेच आमदारांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्...
राज्यात आता कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. राज्यातली अनेक मंत्री तसेच आमदारांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आता अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
सुजय विखे यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.
सुजय विखे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी खबरदारी म्हणून स्वतःला विलागीकरण केले आहे.
तसेच त्यांनी मागच्या काही दिवसात त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्व जणांना कोविड चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
COMMENTS