कान्हुर गणातुन शेतकरी नेते अनिल देठे यांना पंचायत समितीची उमेदवारी द्या उमेदवारीसाठी किन्ही, बहिरोबावाडी ग्रामस्थांचे आ.निलेश लंके यांना स...
कान्हुर गणातुन शेतकरी नेते अनिल देठे यांना पंचायत समितीची उमेदवारी द्या
उमेदवारीसाठी किन्ही, बहिरोबावाडी ग्रामस्थांचे आ.निलेश लंके यांना साकडे !
शेतकरी नेते अनिल देठे पाटील हेच जनतेच्या मनातील उमेदवार !
पारनेर/प्रतिनिधी :
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात केव्हाही लागु शकतात त्या पार्श्वभूमीवर किन्ही गावचे उपसरपंच हरेराम खोडदे व युवा नेते राहुल खोडदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी सकाळी आमदार निलेशजी लंके यांची हंगा येथे भेट घेऊन शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांना कान्हुर पठार पंचायत समिती गणातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन उमेदवारी मिळावी असे साकडे घातले असुन, या आशयाचे पत्र त्यांनी आमदार निलेश लंके यांना दिले आहे.
पञात म्हटले आहे की, शेतकरी नेते अनिल देठे पाटील हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असुन, त्यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना देखिल त्यांनी स्वकर्तृत्वाने सामाजिक व शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी अतिशय उल्लेखनीय व निस्वार्थीपणे कार्य करत आपलं अस्तित्व निर्माण केलेले आहे.
त्यांनी सन २०१७ ला महाराष्ट्र राज्यात झालेल्या ऐतिहासिक शेतकरी संपात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राज्य स्तरावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू, माजी खासदार राजु शेट्टी, शेकापचे आमदार जयंत पाटील, लोक भारतीचे आमदार कपिल पाटील, राष्ट्रीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, डॉ. अजित नवले यांसारख्या दिग्गज नेते मंडळींसह नेतृत्व केलेले आहे.
तसेच तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत असतात, राज्यात भाजपा चे सरकार असताना सलग दोन, तीन वर्ष किन्ही व परिसरातील गावांमधील महावितरण कंपनीने शेतीचा विजपुरवठा वीज बील वसुलीसाठी खंडित केलेला असताना देठे पाटील यांनी राज्यात सर्वात प्रथम महावितरण कंपनीच्या सक्तिच्या विजबील वसुलीला विरोध करून आंदोलनात्मक भुमिका घेत महावितरणला विजपुरवठा पुर्ववत करण्यास भाग पाडले होते. त्याचप्रमाणे फडणवीस सरकारच्या काळात व कोरोनामुळे राज्यात झालेल्या टाळेबंदीदरम्यान त्यांनी दुधदरवाढीसाठी देखील आंदोलनं केलेली आहेत.
सध्या ते किन्ही - बहिरोबावाडी ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य असुन नऊ सदस्यांमध्ये ते सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले एकमेव सदस्य आहेत. त्यामुळे शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांना आपण पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन उमेदवारी दिल्यास कान्हुर पठार, किन्ही, बहिरोबावाडी, करंदी, पिंपळगाव तुर्क या गावांसह पठार भागावर त्यांना मोठा प्रतिसाद मिळेल.व सर्व लोक पक्षीय राजकारण बाजूला ठेवून देठे पाटील यांना तन, मन, धनाने मदत करतील. सध्यस्थितीत पठार भागावर देठे पाटील हेच जनतेच्या मनातील उमेदवार असुन, ते सर्वसमावेशक व सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व असल्याची चर्चा सर्वञ झडत आहे.
तरी आपण त्यांच्या उमेदवारीचा गांभीर्याने विचार करून या उमद्या व कार्यक्षम नेतृत्वाला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती उपस्थितांनी केली आहे. या शिष्टमंडळात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरद व्यवहारे, आदेश परांडे , माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग व्यवहारे, रमेश किनकर, सुभाष निमसे, शंकर खोडदे, श्रीकांत निमसे, दत्तु व्यवहारे, गणेश साकुरे, विशाल निमसे, राहुल व्यवहारे, किरण व्यवहारे, आदिंचा समावेश होता.
अनिल देठे यांच्या उमेदवारीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पाठिंबा
अनिल देठे पाटील यांच्या परस्पर आमदार निलेश लंके यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात माजी आमदार विजयराव औटी व माजी जिल्हा परिषद सदस्य आझादराव ठुबे यांना मानणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश ही बाब विशेष !
अनिल देठे यांची ही आहे जमेची बाजू
शेतकरी, कष्टकरी चळवळीत तयार झालेले व जनतेशी दांडगा जनसंपर्क असलेले शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जान असलेले व ते सोडविण्याचे ज्ञान असलेले व लोकप्रिय आमदार निलेश लंके यांचे विश्वासु सहकारी एक अभ्यासु , आक्रमक , निस्वार्थी , निष्कलंक व चारिञ्यसंपन्न युवा नेतृत्व अशी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांची असलेली जनमानसांतील प्रतिमा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.