शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या कार्यकारी मंडळावर कवियत्री स्वाती ठुबे पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील कान्हुर पठार येथील रहिवासी असलेल्या व खड...
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या कार्यकारी मंडळावर कवियत्री स्वाती ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील कान्हुर पठार येथील रहिवासी असलेल्या व खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कवियत्री स्वाती ठुबे यांची शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या कार्यकारी मंडळावर निवड करण्यात आली आहे.
साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या असलेल्या शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य संस्थेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. १ जानेवारी २०२२ रोजी अहमदनगर येथे पार पडली. त्यावेळी झालेल्या सभेत केंद्रीय कार्यकारी मंडळ निवडण्यात आले आहे.
त्यानुसार स्वाती ठुबे यांची सन २०२२ ते सन २०२४ या त्रैवार्षिक कालावधी करिता केंद्रीय कार्यकारी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.गेल्या अनेक वर्षापासून साहित्य संमेलन व क्षेत्रात स्वाती ठुबे यांचे योगदान अनेक कविता संग्रह व कविता प्रसिद्ध पण झालेल्या आहेत. त्यामुळे साहित्याची आवड व योगदान पाहता "शब्दगंध" च्या संस्थात्मक वाढीसाठी आपले महत्वपूर्ण योगदान राहिलेले असून यापुढेही ग्रामीण भागातील साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील नवोदितांना संधी उपलब्ध होण्यासाठी आपण पुढाकार घ्याल यात शंकाच नाही.
या शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे खजिनदार भगवान राऊत संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी यासंबंधीचे पत्र देऊन बिनविरोध निवडी बद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.
COMMENTS