विकासाची दिशा असलेले नेतृत्व पंढरीनाथ उंडे शिवसेना पक्षाचे समर्थक तसेच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नामदार विजयराव औटी साहेब आणि जिल्हा परिषदेच...
विकासाची दिशा असलेले नेतृत्व पंढरीनाथ उंडे
शिवसेना पक्षाचे समर्थक तसेच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नामदार विजयराव औटी साहेब आणि जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती श्री काशिनाथ दाते सर यांचे विश्वासू तर आहेतच त्याबरोबर आलेल्या कोट्यावधी निधीचा पुरेपुर वापर कर्जुले हर्या ग्रामपंचायतीच्या मदतीने प्रामाणिकपणे करीत आहेत.
म्हणुन आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कि अशा युवा नेतृत्वाला साथ आणि गावाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या पंढरीनाथ साहेबांबरोबर मनापासून जाणे गरजेचे आहे. त्याबरोबर सर्व ग्रामस्थांनी आपले गट-तट, पक्ष विसरून एक दिलाने कामं केले तर भविष्यात आपले 'कर्जुले हर्या' गावं महाराष्ट्राच्या नकाशावर निश्चितपणे आदर्श आणि स्वयंपूर्ण गावाची पताका फडकवेल असा विश्वास वाटतो.
मा.पंढरीनाथ उंडे साहेबांना, अर्थात आपल्या माणसाला प्रत्येकाने शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात, पण त्याबरोबर आलेल्या योजना, निधी यांचे नियोजन आणि त्यातील अडचणीत प्रत्यक्ष सहभागी होऊन किंवा बोलुन सोडविण्याचा प्रयत्न केल्यास, झालेला विकास आणि करावयांची कामे ही उत्कृष्ट प्रकारे होऊ शकतील आणि गावं नक्की समृद्ध होईल. गैरसमज होणार नाहीत.
मात्र त्यावेळी सर्वांनी स्वतःपुरता संकुचित विचार, हेवेदावे किंवा आर्थिक फायदा ह्या गोष्टींना दूर ठेवले पाहिजे आणि अभ्यासपूर्ण चर्चेत सहभागी व्हायला पाहिजे.
मागील पंचवार्षिक आणि पानी फौंडेशन, समृद्ध गावं स्पर्धच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत, चालू आहेत.
यांमध्ये कामाचा उत्तम दर्जा आणि क्वालिटी ही पहायला मिळतेच परंतु पेंडिंग असणाऱ्या कामाच्या अडचणी झपाट्याने सोडविल्या पाहिजेत ही माफक अपेक्षा व्यक्त करतो. तसेंच केलेल्या कामाचं
'दिल से' कौतुक करून त्याची काळजीपूर्वक वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे तरच आपण पुढच्या पिढीसाठी आयडॉल ठरू.
आता पुढे काय? असा प्रश्न मा.पंढरीनाथ साहेब आपण ग्रामस्थांना पडू देणार नाही हा कायम विश्वास वाटतो. मा. काशिनाथ दाते सर यांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणलेल्या निधीचा आपण त्याचं खरोखर 'सोनं' करत आहात हे अभिमानाने सांगावे वाटते. आपण इथुन पुढेही सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल कराल यांत तिळमात्र शंका नाही. एक विनंती आहे कि आपण तरुणांसाठी आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून जर रोजगार निर्मितीवर भर द्यावा व त्यांना भविष्यासाठी सक्षम करावे.
नवीन वर्ष 2022 मध्ये आणि पुढेही आपण गावाच्या सेवेसाठी सदैव तयार असाल!.. अनं असणारच!!... कारण गावं, तालुका पातळीवरील आपली झेप ही लवकरच जिल्हा पातळीवरील नेतृत्वासाठी सक्षम आहात आणि पक्ष श्रेष्ठींनी दखल घेण्याजोगी आहे. आपण आपल्या 'कर्जुले हर्या' गावचे विकासाचे शिल्पकार आणि सर्वसामान्यांचा आवाज तर आहातच. तसेच आलात तर तुमच्याबरोबर.. नाही आलात तर तुमच्याशिवाय ही कामाची पद्धत आम्हांला खुप आवडते बोलण्यातील आपलेपण आणि अचूक निर्णय घेण्याचा तुमची शैली, त्यामागची भूमिका उद्याची नांदी आहे.
अशा या सामान्यातील सामान्य कार्यकर्ते ते शिवसेना उपतालुका प्रमुख पदापर्यंत कुठलाही वारसा नसलेल्या आणि आपल्या विचारावर आणि मनगटावर विश्वास ठेवणाऱ्या लाडके उपतालुका प्रमुख, कर्जुले हर्या गावचे सुपुत्र श्री. पंढरीनाथ उंडे साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देतो.
प्रदीप बगाडे (जलमित्र, पुणे)
COMMENTS