कडूसला तलाव दुरुस्तीसाठी एक कोटी दहा लाखाचां निधी निधीतून पाझर तलावांची दुरुस्ती होऊनपाणीसाठ्यात होणार वाढ बंधार्यामुळे गावांमध्ये जलसमृद्ध...
कडूसला तलाव दुरुस्तीसाठी एक कोटी दहा लाखाचां निधी
निधीतून पाझर तलावांची दुरुस्ती होऊनपाणीसाठ्यात होणार वाढ
बंधार्यामुळे गावांमध्ये जलसमृद्धी!
कडूस सरपंच मनोज मुंगसे यांची माहिती
पारनेर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते यांच्या प्रयत्नातून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पारनेर तालुक्यातील कडूस गावात तलाव दुरूस्ती साठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सरपंच मनोज मुंगसे यांनी दिली.
कडूस येथील पाझर तलाव दरवर्षी पावसाच्या पाण्याने भरतो. परंतु या पाझर तलावाला मोठी गळती असल्याने अवघ्या काही महिन्यात तलावातील पाणी वाहून जाते. या तलावाची पाणी गळती थांबविल्यास व गळतीचे काम दर्जेदार झाल्यास या भागातील शेतीला या पाण्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. ही गरज लक्षात घेऊन सरपंच मनोज मुंगसे यांनी सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला.
त्यानुसार जेवर कि पाझर तलाव - १७ ,लाख ६ हजार पिंपाळगाव ओढा - १७ लाख ७ हजार , नागझरी - १९ लाख १४ हजार, सत्कानी - ३० लाख ६२ हजार, पिंपळ ओढा - २६ लाख ५४ हजार, पाझर तलावाचे विस्तारीकरण व गळती दुरुस्तीसाठी भरीव निधी मंजूर झाला आहे.
बंधार्यामुळे गावांमध्ये जलसमृद्धी !
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी ,जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते, राहुल शिंदे पाटील, सभापती गणेश शेळके यांनी आतापर्यंत विविध योजनातील निधी गाव विकासासाठी दिला असून आता नव्याने जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी निधी दिला असल्याने या निधीतून पाझर तलावांची दुरुस्ती होऊन पाणीसाठ्यात वाढ होईल तसेच बंधार्यामुळे गावांमध्ये जलसमृद्धी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
मनोज मुंगसे सरपंच कडूस
COMMENTS