खा. सुजय विखे यांचे पारनेर तालुक्याला झुकते माप तालुक्यातील रस्ताकामांसाठी १.२१ कोटींचा निधी सुजीत झावरे पाटील यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी...
खा. सुजय विखे यांचे पारनेर तालुक्याला झुकते माप
तालुक्यातील रस्ताकामांसाठी १.२१ कोटींचा निधी
सुजीत झावरे पाटील यांची माहिती
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामासाठी खासदार सुजय विखे यांनी १.२१ कोटींचा निधी दिला असल्याची माहिती जि.प.मा. उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विशेष दुरुस्ती अंतर्गत सन २०२१-२२ च्या अंतर्गत पारनेर तालुक्यातील विविध रस्ता कामासाठी नगर- दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार विखे पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने केंद्र शासनाच्या रस्ता दुरुस्ती अंतर्गत जिल्ह्यातील सर्वात जास्त निधी पारनेर तालुक्यातील रस्तासाठी मंजुरी मिळाली आहे.
रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल सुजित झावरे यांनी खासदार विखे पाटील यांचे पारनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना सुजित पाटील म्हणाले की, या अगोदर देखील खासदार विखे यांनी पारनेर तालुक्यातील विविध रस्ताकामांसाठी सुमारे २५.०० कोटी रु केंद्र शासनाच्या वतीने दिले असुन सदर कामे देखील सुरू करण्यात आली आहेत.
COMMENTS