वासुंदे येथे प्रजासत्ताक दिन साजरा; विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप झावरे कुटुंबाने जपली सामाजिक बांधिलकी पारनेर/प्रतिनिधी : वास...
वासुंदे येथे प्रजासत्ताक दिन साजरा; विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
झावरे कुटुंबाने जपली सामाजिक बांधिलकी
पारनेर/प्रतिनिधी :
वासुंदे येथे प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय वासुंदे न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासुंदे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
वासुंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ शिक्षक सध्या जि. प. प्राथ. शाळा शिंदोडी येथे मुख्याध्यापक पदी कार्यरत असणारे श्री.स्वामी समर्थ सहकारी बँकेचे संचालक श्री अंबादास झावरे गुरुजी यांच्या वतीने डेस्क भेट देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना यावेळी निलेश उर्फ दादा भालके यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनासाठी शालेय पुस्तकाचे व साहित्याचेही वाटप केले.
याप्रसंगी झावरे कुटुंबातील मा.चेअरमन बाळासाहेब झावरे व इंजि.प्रसाद झावरे यांचा समस्त ग्रामस्थ व जि.प. प्राथ.शाळा वासुंदे यांच्या वतीने सत्कार करताना सरपंच सुमनताई सैद, भाऊशेठ सैद, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन दिलीपराव पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य रामदास झावरे, बाळासाहेब शिंदे, सुदाम शिर्के, पोपटराव साळुंके, जालिंदर वाबळे, रामचंद्र झावरे सर, बाबाजी झावरे, मारुती उगले, प्रल्हाद भालेकर सर, लक्ष्मण चेमटे सर व ग्रामस्थ, शिक्षक वृंद सर्व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.