शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीने राबविला उपक्रम कोरोना काळात अनाथ झा...
शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीने राबविला उपक्रम
कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप
अहमदनगर प्रतिनिधी :
अहमदनगर राष्ट्रवादी युवती पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून जिल्ह्यात साजरा करण्यात आला.
अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचे अध्यक्षा राजेश्वरी कोठावळे या विविध सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात नेहमी राबवत असतात देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस खर्या अर्थाने सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात यावा म्हणून राजेश्वरी कोठावळे यांनी अहमदनगर जिल्ह्यात कोरोना काळात आपले आई-वडील गमावलेल्या मुलामुलींना शालेय साहित्याचे वाटप करून शरद चंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी राजेश्वरी कोठावळे यांच्या समवेत मयुरी झरेकर व इतर युवती पदाधिकारी उपस्थित होत्या.
शरदचंद्रजी पवार साहेब हे नेहमी सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करत असतात त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवून साजरा करणे व त्यांच्या पुरोगामी विचारांना तसेच सामाजिक विचारांना प्रेरणा ठेवून समाजात काम करणे या सामाजिक भावनेतून पवार साहेबांचा वाढदिवस आम्ही सामाजिक उपक्रम राबवत खऱ्या अर्थाने साजरा केला आहे.
राजेश्वरी कोठावळे (जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, अहमदनगर)
COMMENTS