टाकळी ढोकेश्वर नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी केली कोरोनावर मात मास्क, पुस्तके देऊन विद्यार्थ्यांना पाठविले घरी आरोग्य कर्मचाऱ्यांच...
टाकळी ढोकेश्वर नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी केली कोरोनावर मात
मास्क, पुस्तके देऊन विद्यार्थ्यांना पाठविले घरी
आरोग्य कर्मचाऱ्यांचा नीलेश लंकेंच्या हस्ते सन्मान
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या १२ विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.२) कोरोनावर मात केली. आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते कोरोनावर मात केलेल्या विद्यार्थ्यांना मास्क, पुस्तक आणि फूल भेट देऊन घरी पाठविण्यात आले.
नऊ दिवस आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे या विद्यार्थ्यांची सेवा केली. याबद्दल त्यांचा लंके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नवोदय विद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांसह ८४ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले होते. त्यांना उपचारासाठी पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील १२ विद्यार्थी रविवारी कोरोनामुक्त झाले. उर्वरित विद्यार्थ्यांमध्येही सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. त्यांनाही कोरानामुक्त झाल्यानंतर क्रमाक्रमाने दोन दिवसांत सोडण्याचे नियोजन नवोदय विद्यालय आणि आरोग्य प्रशासन करत असल्याचे सांगण्यात आले.
COMMENTS