अहमदनगर प्रतिनिधी - तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दररोज चोऱ्या,घरफोडी अशा घटना घडत आहेत पोलिस प्रशासन य...
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दररोज चोऱ्या,घरफोडी अशा घटना घडत आहेत पोलिस प्रशासन या चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरत आहेत, नुकतेच काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चक्क पाईपलाईन रोड वरील तागड वस्ती येथे असलेल्या पुरातन संकट मोचन हनुमान मंदिराच्या दानपेटी वर डल्ला मारला आहे.
गेल्या तीन वर्षापासून मंदिरातील दानपेटी उघडली गेली नव्हती त्यामुळे या दानपेटी मध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल असू शकतो मंदिरातील पुजारी रवींद्र वामन पाटील सांगतात की, हे पुरातन मंदिर आहे पाच वर्षानंतर ही दानपेटी उघडली जाते या दानपेटीच्या माध्यमातून मंदिराचे नूतनीकरण करायचे होते परंतु चोरट्यांनी केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेले आहे. सदर चोरीची घटना झाल्यानंतर पुजारी रविंद्र वामन पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू आहे.
पोलीस प्रशासनाचा आरोपींवर वचक राहिला नाही असा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होऊ लागला आहे ? तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी,घरफोडी अशा अनेक घटना वारंवार घडत आहे या सर्व घटनांवर पोलीस प्रशासन नियंत्रण मिळणार का असा प्रश्न दहावी उपनगर भागातील नागरिक उपस्थित करू लागले आहे.