वेब टीम : मुंबई राज्यात सध्या गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला आहे. या थंडीनं हुडहुडी भरविली आहे. त्यामुळे नाग...
राज्यात सध्या गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला आहे. या थंडीनं हुडहुडी भरविली आहे.
त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झालं होतं. वाढलेल्या आर्द्रतेतून धुकं आणि धूळ वाढवणार्या वेगवान वार्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.
धुळीच्या वादळामुळे राज्यातील अनेक भागातील पारा घसरला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे. 25 व 26 जानेवारी रोजी उत्तर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
COMMENTS