नगर- सालाबादप्रमाणे गणेश जयंतीनिमित्त एकदंत गणेश मंडळाच्यावतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त...
नगर-
सालाबादप्रमाणे गणेश जयंतीनिमित्त एकदंत गणेश मंडळाच्यावतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्या सर्व कार्यक्रमाचा शुभारंभ व रक्तदान शिबीराचे उद्घाटन मार्कंडेय विद्यालयाचे संचालक राजू म्याना, कार्यक्रमाचे अध्यक्ष कुबेर मार्केटचे संचालक बबलू पतके, पो. कॉ. अभिजित अरकल, गणेश सब्बन, सौ.संगिता सबन्न आदींच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी रक्तदान शिबीरात श्री एकदंत गणेश मंडळाच्या 122 युवकांनी उत्सर्फुतपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबीरात दातरंगे मळा परिसरातील नागरीकांसह नगर शहरातील युवकांनी सहभाग घेतला.
यावेळी राजू म्याना म्हणाले कि, एकदंत कॉलनीतील बहुसंख्य समाज हा पद्मशाली समाज असून हा समाज अतिशय प्रामाणिक, कष्टकरी, होतकरु व मेहनती आहे. अतिशय गरिबीतून काम, शिक्षण पूर्ण करुन आज या समाजाची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात ही कार्यरत आहे. आज गणेश जयंती निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक काम मंडळाच्या वतीने राबवुन समाजात अतिशय चिकाटीचे काम मंडळ करत आहेत. कोरोना या महामारीच्या संकटामुळे आज रक्ताचा तुटवडा पडला आहे, मंडळाच्यावतीने आज हे शिबीर घेवुन चांगली सेवा घडवुन आणली असून त्या माध्यमातून कित्येक जणांचे प्राण वाचविण्याचे काम मंंडळाकडून होत आहे. हि कौतुकास्पद बाब आहे. तसेच नवीन पिढीही या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचे काम होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अभिजित अरकल म्हणाले की, 18 वर्षापासून मंडळाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन आज श्री एकदंत गणेश मंडळाने नगरशहरात नाव कमवले आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. रक्त कुठे ही तयार होत नाही, माणसालाच रक्तदान करावे लागते. त्यामुळे आपल्या कडून होईल तितक्या प्रमाणात रक्तदान शिबीर भरवावे, जेणे करुन येणार्या संकटाला सामोरे जाताना रक्तदानाची अडचण निर्णाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बबलू पतके, गणेश सब्बन, सौ.संगिता सब्बन, यांनी ही आपले मनोगतातून गणेश जयंती उत्सव म्हणजे आता या नगर शहराची एक ओळख बनली आहे. या उत्सवाच्या माध्यमातुन गरजू लोकांना मोठा लाभ होत आहे. धार्मिक उत्सव म्हटलं कि धार्मिक विधी, विविध पुजा-आर्चा, भजन, किर्तन या पलीकडे जाऊन मंडळाने या कार्यक्रमांना आरोग्य शिबीरांची जोड देऊ केल्यामुळे आज अनेकांना याचा लाभ होत आहे.रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपण कोणाला तरी जीवनदान देतो, याचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकांने वर्षातुन एकदा करावे. रक्त हे कोणत्या फॅक्ट्रीत तयार होत नाही. गरज भासल्यास कोणी तरी रक्तदान करावेच लागते, या उद्देशानेच मंडळाच्यावतीने गेल्या 18 वर्षापासून रक्तदान शिबीर भरविण्यात येत आहे, असे मंडळाच्यावतीने रोशन सुंकी यांनी सांगितले.
धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मंडळाने सामाजिक कार्यक्रमही घेतले आहेत. या शिबीरात 122 रक्त पिशव्यांचे संकलन झाले. रक्त संकलनाचे कार्य आनंदऋषीजी ब्लॅड बँकेच्यावतीने करण्यात आले. रक्तदान करणार्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी 150 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. तसेच 88 लहान मुला-मुलींचे ब्लड गु्रप तपासणी करण्यात आली. या शिबीराला आनंदऋषीजी ब्लड बँकेचे सुनिल महानोर, डॉ.शंकर मोरे, संदिप भोसले, मोनिका चांडक, पुनम दस्तुरकर, सुरेखा पालवेे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी एकदंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व एकदंत महिला मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भिमराज कोडम यांनी केले. तर आभार गणेश गुडा यांनी मानले.