ढोकी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे वैजंताताई हरेल यांनी व्यक्त केली भावना प...
ढोकी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे
वैजंताताई हरेल यांनी व्यक्त केली भावना
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील ढोकी या ठिकाणी ग्रामपंचायत च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ढोकी येथील ग्रामस्थांनी घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले महाराजांचे विचार हे आजही समाजाला प्रेरणा देत असून त्यांच्या विचारांना आदर्श मानून समाज व्यवस्था काम करत आहे. अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ढोकी गावच्या सरपंच चंद्रभागा बापू मोरे, महिला बचत गटाच्या सी. आर. पी. दिलीप मोरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक नऱ्हे, बाबासाहेब नऱ्हे, दिलीप धरम, सुनील शिंदे, एकनाथ नऱ्हे, बाळू धरम, वंदना राजापुरे, देवराम नऱ्हे, बाळू नऱ्हे, मेजर राजेंद्र आल्हाट, अशोक धरम, नवनाथ वाकचौरे, भाऊसाहेब मोरे, अल्लाबक्ष पठाण, निसार शेख, हुसेन पठाण, अब्दुल पठाण, संतोष धरम तसेच ढोकी येथील ग्रामस्थ व महिला बचत गटाच्या महिला यावेळी कार्यक्रमास उपस्थित होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे प्रेरणा देणारे असून त्यांनी समाजासाठी केलेले काम हे अद्वितीय आहे. आपल्या या छत्रपतीच्या कार्याची आपण सर्वांनी नेहमीच पूजन केले पाहिजे. सर्व शेतकरी वर्गाला तसेच महिला बंधू-भगिनींना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देते.
वैजंताताई हरेल
(महिला बचत गटाच्या सी. आर. पी.) उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा रयत शेतकरी संघटना
COMMENTS