पाडळी येथील भगवान उबाळेंचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान जलसंपदा विभागात उबाळेचीं उत्कृष्ट वसुली पारनेर प्रतिनिधी : २०२०-२०२१ या वर्षामध्ये कोर...
पाडळी येथील भगवान उबाळेंचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
जलसंपदा विभागात उबाळेचीं उत्कृष्ट वसुली
पारनेर प्रतिनिधी :
२०२०-२०२१ या वर्षामध्ये कोरोनाची परिस्थिती असताना सिंचन व्यवस्थापन आकारणी व उत्कृष्ट वसुली करत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जलसंपदा विभागाच्या वतीने भगवान उबाळे यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले आहे.
वाडेगव्हाण सब डिव्हिजन शाखेत भगवान उबाळे हे गेली ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. उबाळे यांनी शाखेअंतर्गत काम करत असताना त्यांनी व शाखा अधिकाऱ्यांनीं उपलब्ध पाण्याचा वापर सुयोग्य, सुनियंत्रीत व काटकसरीने करावा हा विचार शेतकऱ्यांच्या मनात रूजविला. यातून शेतकऱ्यांना पाण्याची जाणीव तयार झाली व त्यातून शेतकऱ्यांनीं मोठ्या प्रमाणात पानपट्टी भरली. तसेच सतत वसुलीसाठी शेतकऱ्यांचे प्रोबोधन करत उत्कृष्ट वसुली केली .
वाडेगव्हाण येथे भगवान उबाळे यांचा सत्कार करताना उपविभागीय आभियंता भाग्यश्री चवणे मँडम , शाखाअधिकारी अशोक लटांबळे, साहेब, चौरे साहेब, पठाण रावसो, शिंदे रावसो, योगेश करंजुले व इतर कर्मचारी उपस्थित होते. भगवान उबाळे यांना प्रशस्तीपत्रक मिळाल्याबद्दल मंगळवेढा तालुक्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे, सरपंच विक्रमसिह कळमकर, उपसरपंच डी बी करंजुले , आप्पासाहेब कळमकर, माजी चेअरमन कचरूअण्णा उबाळे, चेअरमन विठ्ठलराव साठे, आप्पासाहेब साठे, किरण साठे, संगम साठे, भास्कर पाटील, भगवान करंजुले, सुभाष पाटील, पत्रकार दीपक करंजुले, यांच्यासह विसावा मित्रमंडळीनीं अभिनंदन केले आहे.