वडगाव सावताळ सेवा सोसायटीत 'परीवर्तन' सुजित झावरे पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वडगा...
वडगाव सावताळ सेवा सोसायटीत 'परीवर्तन'
सुजित झावरे पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व
टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत दत्तसावताळ परीवर्तन मंडळाने बाजी मारली आहे. या सोसायटीची निवडणूक शनिवार दि.२६ रोजी सुरळीत पार पडली.मतदान झाल्यानंतर लगेचच
मतमोजणी करण्यात आली.या निवडणुकीत दत्तसावताळ परीवर्तन मंडळाने १२ जागा जिंकत बहुमत मिळविले तर सत्ताधारी दत्तसावताळ जनसेवा मंडळास केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले.
परीवर्तन मंडळाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील गटाचे अशोक पा.रोकडे, मा.सरपंच राजु रोकडे,कर्ण रोकडे सर यांनी केले. तर सत्ताधारी जनसेवा मंडळाचे नेतृत्व मा.सरपंच बी.डी.शिंदे, चेअरमन सर्जेराव रोकडे सर यांनी केले.
विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या या निवडणुकीत परीवर्तन मंडळाचे कर्ण रोकडे, बाबासाहेब दाते,दादाभाऊ रोकडे, शिवाजी रोकडे, नामदेव शिंदे,हनुमंत ठाणगे,सचिन रोकडे, दादाभाऊ आंबेकर, पंढरीनाथ व्यवहारे,चंद्रकांत
झिटे तसेच महिला गटात सविता भोसले, सुभद्रा जाधव हे सर्व विजयी झाले तर सत्ताधारी मंडळाचे गोरक्ष रोकडे विजयी झाले.मतमोजणी नंतर परीवर्तन मंडळाने
मोठा जल्लोष केला.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. के.के.आव्हाड यांनी काम पाहिले त्यांना सचिव विजय गायकवाड यांनी सहकार्य केले.निवडणुकीसाठी टाकळी ढोकेश्वर दुरक्षेत्रातील पो.कॉँ. साळवे व त्यांच्या सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.