वेब टीम : पुणे शिवसेनेचे माजी खासदार आणि काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले गजानन बाबर यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मागील क...
वेब टीम : पुणे
शिवसेनेचे माजी खासदार आणि काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले गजानन बाबर यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
मागील काही दिवसांपूर्वी बाबर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज बाबर यांची प्राणज्योत मालवली.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबर यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गजानन बाबर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रथम त्यांना निरामय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती जास्तच खालावल्याने काल त्यांना बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात हलवले.
अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मावळमधे शिवसेना पक्षाविस्ताराच्या दृष्टीने गजानन बाबर यांचे योगदान होते. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची पहिली शाखादेखील बाबर यांनीच सुरू केली होती. मात्र काही वर्षांपूर्वी बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
COMMENTS