अहमदनगर प्रतिनिधी : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे प्रत्येकाला सर्व सुविधा मिळून शिक्षण मिळण्य...
अहमदनगर प्रतिनिधी :
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे प्रत्येकाला सर्व सुविधा मिळून शिक्षण मिळण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येणे गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकीतून व सकारात्मक दृष्टिकोनातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून आपले कर्तव्य बजावे सण-उत्सव वाढदिवस साजरे करीत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून शिक्षण क्षेत्रामध्ये गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे माझ्या वाढदिवसानिमित्त उद्योजक संजय चव्हाण यांनी माझी शालेय साहित्य तुला करुनआठरे पाटील बालगृह येथे गरजू विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करुन शालेय साहित्याचे तुला करत अनाथांना मदतीचा हात देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन लोकनेते आमदार निलेश लंके यांनी केले.
एमआयडीसी येथील आठरे पाटील बालगृह येथे लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक संजय चव्हाण यांच्या वतीने आमदार लंके यांची शालेय साहित्याची तुला करून वाटप करण्यात आले. यावेळी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, आठरे पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनील आठरे, ग्रामपंचायत सदस्य हेमा चव्हाण, अशोक सचदेव ,सागर सप्रे, प्रभोद तुपे, विशाल चव्हाण, निलेश चव्हाण, अनिकेत चव्हाण,ऋषीकेश चव्हाण, प्रवीण वारुळे, विनोद ठुबे,बालगृह अधिक्षक पुष्पांजली थोरात, प्रकाश डोंगरे, विकास वांडेकर, संग्राम साठे,रुपेश सातपुते, मच्छिंद्र पांढरकर, अक्षय पिसे आदी उपस्थित होते .
उद्योजक संजय चव्हाण म्हणाले की लोकनेते आमदार निलेश लंके यांनी समाजासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या याच बरोबर सर्वसामान्यशी असलेले ऋणानुबंध व अतूट नाते यामुळेच समाजामध्ये विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागले जात आहे तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे काम लोकनेते आमदार निलेश लंके करत असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून आठरे पाटील बालगृहातील गरजू विद्यार्थ्यांनाआमदार लंके यांची शालेय साहित्याचे तुला करून वाटप केले.आणी या पुढे ही या आनाथ मुलांना काही कमी पडून देनार नाही त्यांना आनाथ असल्याचे भासू देनार नाही असेते म्हणाले.