म्हसोबा झाप ग्रामपंचायत आज करणार अर्थसंकल्प सादर अर्थसंकल्प सादर करणारी ठरणार राज्यातील पहिली ग्रामपंचायत सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पा...
म्हसोबा झाप ग्रामपंचायत आज करणार अर्थसंकल्प सादर
अर्थसंकल्प सादर करणारी ठरणार राज्यातील पहिली ग्रामपंचायत
सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील म्हसोबा झाप ग्रामपंचायत आज राज्यातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे ग्रामपंचायत स्तरा वर अर्थसंकल्प सादर करणारी म्हसोबा झाप ही ग्रामपंचायत राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरणार आहे जानेवारी २०२१ मध्ये म्हसोबा झाप च्या सरपंच पदी प्रकाश गाजरे यांची निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी विविध विकासाची कामे मार्गी लावली आहेत.
पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात काम करताना म्हसोबा झाप मध्ये विविध विकासभिमुख कामे केली आहेत.
दरम्यान गेल्या वर्षी सरपंचपदी निवड झाल्यानंतर मार्च मध्ये ग्रामपंचायत स्तरावर प्रथम अर्थसंकल्प सरपंच प्रकाश गाजरे यांनी मांडला. त्यावेळी एकूण १ कोटी २७ लाखाचे बजेट मांडले होते. परंतु गेल्या आर्थिक वर्षात म्हसोबा झाप ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच प्रकाश गाजरे यांच्या माध्यमातून जवळ जवळ ३ कोटी ४५ लाख २९ हजार रुपयाची एकूण कामे मार्गी लागली आहेत. आज ३१ मार्च रोजी ते २०२२ व २३ साठी अर्थसंकल्पीय बजेट ग्रामपंचायत म्हसोबा झाप येथे सादर करणार आहेत यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती यावेळी सरपंच प्रकाश गाजरे यांनी दिली.
सरपंच प्रकाश गाजरे यांनी म्हसोबा झाप ग्रामपंचायत मध्ये अर्थसंकल्पीय विकासाचे बजेट सादर करून स्थानिक पातळीवर आम्हा ग्रामस्थांन समोर विकासाचा अजेंडा ठेवला आहे. त्या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक विकास कामे आता मार्गी लावत आहेत त्यामुळे गावच्या विकासाला दिशा मिळाली आहे.
पांडुरंग आहेर (ग्रामस्थ म्हसोबा झाप)