सावरगाव मध्ये स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी बेलकर बंधू एकत्र सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सर्वसामान्यांनी बेलकर बंधूंच्या विरोधात बांधली मोट ...
सावरगाव मध्ये स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी बेलकर बंधू एकत्र
सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सर्वसामान्यांनी बेलकर बंधूंच्या विरोधात बांधली मोट
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सावरगाव येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात नेहमी राजकीय भूमिका घेणारे बेलकर बंधू आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आता एकत्र आले आहेत. सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सर्वसामान्य व प्रस्तापित धनाढ्य अशी लढत पाहायला मिळत आहे.
सावरगावच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित बेलकर बंधूंच्या नेतृत्वाखाली जय हनुमान ग्रामविकास पॅनल तर समोर देवराम मगर, उपसरपंच प्रदीप गुगळे, भास्कर शिंदे, संतोष चौगुले, चंद्रभान चिकणे यांच्या नेतृत्वाखाली जय बजरंगबली शेतकरी ग्रामविकास पॅनल हे पॅनल एकमेकांसमोर उभे असून प्रस्थापित बेलकर बंधून समोर आता सर्वसामान्यांनी आव्हान उभे केले आहे.
या निवडणुकीत सर्वसामान्यांच्या जय बजरंगबली शेतकरी ग्रामविकास पॅनलने सहकार क्षेत्राला बळकटी मिळण्यासाठी व शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सेवा सोसायटीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
स्वतःचा राजकीय विरोध बाजूला ठेवून आपल्या राजकीय अस्तित्वासाठी बेलकर बंधूंनी सर्वसामान्यांची दिशाभूल केली असून सावरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आपली राजकीय एकत्र मोट बांधल्यामुळे आता सर्वसामान्य ग्रामस्थांमधून रोष व्यक्त होत आहे.
बेलकर बंधू एकत्र आल्यामुळे या निवडणुकीकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
।