आमदार निलेश लंकेंचा जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज बुलंद पारनेरच्या पाणीप्रश्नावर आमदार निलेश लंके यांनी मांडली अधिवेशनात भूमिका आ.निलेश...
आमदार निलेश लंकेंचा जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज बुलंद
पारनेरच्या पाणीप्रश्नावर आमदार निलेश लंके यांनी मांडली अधिवेशनात भूमिका
आ.निलेश लंकेंनी पारनेर तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नासह आरोग्य व औद्योगिक प्रश्नांकडे वेधले सरकारचे लक्ष !
साकळाई, कान्हुरपठार , राळेगणसिद्धी, जातेगाव , पुणेवाडी या उपसा जलसिंचन योजनांकरिता निधीची केली मागणी !
शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधल्याने पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेकडुन आ.लंकें यांच्यावर होतोय कौतुकांचा वर्षाव !
गणेश जगदाळे/पारनेर
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत येथे सुरू आहे. या अधिवेशनात पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके यांनी मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी , बेरोजगार तसेच सततच्या दुष्काळामुळे पिडीत असलेल्या जनतेच्या मुलभूत व ज्वलंत प्रश्नांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी मंगळवारी सभागृहामध्ये केली.
यादरम्यान बोलताना आ.लंकेंनी सांगितले की , मी ज्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघात सदैव दुष्काळ असतो त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी कष्टकरी वर्गाला विविध समस्यांचा सातत्याने सामना करावा लागतो तरी सरकारने माझ्या मतदारसंघातील दुष्काळाने पीडित असलेल्या जनतेला समृद्ध करण्यासाठी व त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी साकळाई , कान्हुरपठार, राळेगणसिद्धी, जातेगाव, पुणेवाडी या उपसा जलसिंचन योजनांकरिता भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी मी स्वतः राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे. आणि ते निश्चितच निधी उपलब्ध करून देतील असा मला विश्वास देखील आहे. तसेच आ.लंके यांनी पारनेर येथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळावी व नगर , पुणे या महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने सुपा येथे ट्रामा सेंटर मिळावे अशीही मागणी केली. त्याचप्रमाणे मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तालुक्यातील ढवळपुरी परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी व यासाठी राज्याच्या उद्योग मंञ्यांनी आवर्जुन लक्ष घालावे अशी विनंती केली. आमदार निलेशजी लंके यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघातील गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नासह आरोग्यच्या व उद्योग व्यवसायांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्याने आ.निलेश लंके यांच्यावर मतदारसंघातील जनतेकडून सोशल नेटवर्किंग साइटवर कौतुकाचा मोठा वर्षाव झाला असुन , जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर काम करणारा लोकप्रतिनिधी आ.निलेश लंके यांच्या रूपाने लाभला असल्याचे गौरवोद्गार संपूर्ण मतदारसंघातील जनतेकडून निघु लागले आहेत. आ.लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामामुळे ते देशभर चर्चेत आले यामुळे त्यांची समाजात कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. आमदार लंके यांनी आपल्या सामाजिक कार्यातून व विविध उपक्रमांमधून आपले वेगळेपण सिद्ध केलेले असल्याने राज्यातील मंत्रीगण देखील त्यांनी केलेल्या विविध विकास कामांच्या मागण्या पूर्ण करताना दिसत आहेत. त्यामुळे आमदार निलेश लंके यांनी मंगळवारी सभागृहात मतदारसंघातील पाणी , आरोग्य व उद्योग या जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली असल्याचेच यावरून दिसत आहे.
पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व कष्टकरी वर्गाचा अतिशय ज्वलंत बहुचर्चित व बहुप्रतिक्षित पाण्याच्या प्रश्नासह आरोग्य व उद्योग क्षेञातील विविध प्रश्नांवर आ.निलेश लंके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रकाश टाकत ते प्रश्न सोडवण्यासाठी टाकलेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.आ.लंकें यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न हे सर्वसामान्य जनतेशी निगडित असुन , हे प्रश्न सुटल्यास मतदारसंघातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठी मदत होईल.व हे प्रश्न महाविकास आघाडीकडुन सोडून घेण्यास आ.लंके निश्चितच यशस्वी होतील असा मला दृढ विश्वास आहे.
-- अनिल देठे पाटील
( शेतकरी नेते )
COMMENTS