पारनेर प्रतिनिधी : समर्थ विद्यालय ,पोखरी या ठिकाणी इ 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे मा श्री सुजितराव झाव...
पारनेर प्रतिनिधी :
समर्थ विद्यालय ,पोखरी या ठिकाणी इ 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे मा श्री सुजितराव झावरे पाटील (माजी उपाध्यक्ष जि प अहमदनगर, अध्यक्ष भा.म. शि.मंडळ,वासुंदे)तसेच ह. भ. प. गणेश महाराज बेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .या वेळी श्री जाधव सर यांनी प्रास्ताविक केले व अध्यक्ष निवड केली . इ 10 वी,8वी च्या मुलींनी स्वागत गीत सादर करून केले मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन ,छत्रपती शिवाजी महाराज व स्व. वसंतराव झावरे पाटील(दादा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यांनतर मा. सुजितरावजी झावरे पाटील यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग बर्वे सर यांनी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष
ह .भ. प .गणेश महाराज बेलकर यांचा सत्कार मा सतिष भाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर इयत्ता 5वी ते9 वी च्या विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच 10 च्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच श्री शिरसाठ सर ,श्री साळवे डी.के. सर,श्री सागर सर ,श्री घोगरे सर ,श्रीमती आहेर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बाबासाहेब खिलारी(टा. ढोकेश्वर), सरपंच सतीश भाऊ पवार ,संजय काशिद, निजाम भाई पटेल,नामदेव करंजेकर,अशोक खैरे,गोरख फरतारे,बाबाजी वाकळे, माजी विद्यार्थी भाऊ पवार या सर्वांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. गणेश महाराज यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे मा.सुजितराव झावरे पाटील यांनी 10 वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना संस्कार आणि शिक्षण याविषयी तसेच अवांतर पुस्तक वाचन आणि तसेच त्यांच्या शाळेतील लहानपणीच्या आठवणी सांगत बहुमोल असे मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक पी.एस. बर्वे सर यांनी इमारत विषयी मांडलेल्या विषयावर लवकरच आपणा सर्वांचे मदतीने व ग्रामस्थांनी मांडलेल्या 11वी ,12 वीचे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय टाळण्यासाठी लवकरच वर्ग चालू करू असे आश्वासन दिले.
तरी या कार्यक्रमासाठी गावातील व पंचक्रोशीतील म्हताजी पवार,रोहिदास शिंदे,आण्णासाहेब पवार,परसराम शेलार,महादू पवार,कुंडलिक पवार,अनिल शिंदे ,साहेबराव फडतारे, कारभारी पवार, बबन पवार ,मन्सूर पटेल,जनार्धन काशीद,संजय काशीद, भाऊसाहेब चौधरी,सुभाष टेकूडे, भाऊसाहेब थोरात,शाम खैरे,अमीन पटेल, शुभम पवार,अशोक आहेर,योगेश पवार,असे अनेक मान्यवर ग्रामस्थांनी कार्यक्रमास हजेरी लावली .कार्यक्रम नियोजन श्री गणेश पुरी,श्री शांताराम कसबे, श्री बागुल मामा यांनी केले .सूत्र संचालन श्री सचिन खैरे सर व आभार श्री साळवे बी. एस. सर यांनी मानले.कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.