भाळवणीचा शेअर मार्केट किंग अखेर गजाआड दामदुप्पट'चे आमिष दाखवून पावणे दोन कोटीची केली फसवणूक पारनेर/प्रतिनिधी : दामदुपटीचे अमिष दाखवून एक...
भाळवणीचा शेअर मार्केट किंग अखेर गजाआड
दामदुप्पट'चे आमिष दाखवून पावणे दोन कोटीची केली फसवणूक
पारनेर/प्रतिनिधी :
दामदुपटीचे अमिष दाखवून एक कोटी ७९ हजार रूपयांची फसवणूक करणारा मुख्य आरोपी गजाआड करण्यात आला आहे. नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
वैभव अनंत चेमटे (रा. भाळवणी, ता. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आर पी चेमटे याच्यासह पाच जणांनी फिर्यादी प्रसाद भणगे (रा. भानसहिवरा, ता. नेवासा) यांना पैसे दोन वर्षात दामदुप्पट करण्याचे अमिष दाखविले होते. भणगे यांच्याकडून एक कोटी ७९ लाख रूपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या संदर्भात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चेमटे याने अनेक नागरिकांना दामदुप्पट पैशाचे अमिष दाखवून फसवणूक केली आहे. ज्या लोकांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी नेवासा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केले आहे.