वेब टीम : नागपूर न्यायमूर्ती लोया यांचा नागपुरात झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून ती हत्या आहे. परंतू तत्कालीन फडणवीस सरकारने हे प...
वेब टीम : नागपूर
न्यायमूर्ती लोया यांचा नागपुरात झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून ती हत्या आहे. परंतू तत्कालीन फडणवीस सरकारने हे प्रकरण दाबले. न्यायालयात खोटे पुरावे सादर करून न्यायालयाचीही फसवणूक करण्यात आली.
याबाबतचे सर्व पुरावे आता हाती आले असून याप्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करावा, अशी मागणी वकील सतीश उके यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी नागपूर शहरचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासमोर एक हरकत याचिकाही दाखल केली होती.
त्यात फडणवीस यांच्या कार्यकाळात न्यायालयापासून लवविण्यात आलेले सर्व पुरावे नमूद केले होते. त्याचप्रमाणे लोया प्रकरण उचलून धरल्याने माझ्याविरोधात अनेक खोट्या तक्रारी करण्यात येत असल्याचे उके यांनी सांगितले होते.
शिवाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून लोया प्रकरणाचे सर्व पुरावे सादर केले होते. त्यामुळे त्यांच्यावर सूडूबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचेही उके यांनी सांगितले होते.
फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांवर गंभीर केल्याने ते वादग्रस्त ठरले आहेत. भाजपा नेत्यांवर आरोप करून न्यायालयात याचिका दाखल करणारे आणि न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करणारे वकील सतीश उके यांच्यावर ईडीने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
सतीश उके जिल्हा आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. त्यांनी अनेक वेळा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.
ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तेव्हापासून उके हे सतत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहेत.
उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने देखील केस लढवली होती. सतीश उके यांची राजकीय वर्तळात उठबस आहे.
COMMENTS