वडगाव सावताळच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू सलून असोसिएशनचे संदीप खंडागळे यांचा आरोप पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील महत्वपूर्...
वडगाव सावताळच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू
सलून असोसिएशनचे संदीप खंडागळे यांचा आरोप
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागामध्ये जाणारा वासुंदे वडगाव सावताळ रस्त्याच्या डांबरीकरण कामाची सुरुवात झाली असून हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सलून असोसिएशनचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष संदीप खंडागळे यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदार यांना रस्त्याचे सुरू असलेले काम योग्य पद्धतीने व्हावे अशी विनंती केली. अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेऊ.
वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहत असून या भागात गाजदीपुर, वनकुटे, तास तसेच पुढे राहुरी तालुक्याला महत्वपूर्ण जोडला जाणारा हा रस्ता असून हा रस्ता तीस वर्षापासून प्रलंबित होता. आता काम सुरू झाले आहे. परंतु काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा लक्षात आल्यामुळे संदीप खंडागळे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्यक्ष रस्त्याच्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत पारनेर तालुका अँटिकरप्शनचे अध्यक्ष मनोज झावरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश उर्फ दादा भालके, उद्योजक सोमनाथ झावरे, अर्जुन रोकडे, मंगेश रोकडे, दादाभाऊ खंडागळे, योगेश शिंदे, प्रवीण साळुंके, अनिल गायकवाड, सतिश गायकवाड, प्रमोद गायकवाड व ग्रामस्थ हे यावेळी उपस्थित होते.
COMMENTS