सुप्या जवळ भीषण अपघात सहा जखमी पारनेर प्रतिनिधी : अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील पवारवाडी येथील धोकादायक वळणावर ...
सुप्या जवळ भीषण अपघात सहा जखमी
पारनेर प्रतिनिधी :
अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील पवारवाडी येथील धोकादायक वळणावर अपघात झाला. कंटेनर, कार यांच्या विचित्र अपघ- तात कार मधील पाचजण गंभीर जखमी झाले.
हरिदास प्रल्हाद उबाळे (रा. भेंडाटाकळी) यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. सोमवारी स्विप्ट कारने नगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना सुपाजवळील पवारवाडी परिसरात कंटेनर चालक महंमद सुलेमान याने वाहन बेजबादारपणे चालवत रोड दुभाजकावर धडकून कारला धडक दिली. यात कारमधील मुरलीधर गणपत कानडे, बन्सी दादाराम उबाळे, गंगाराम बाबुराव कादे, दिलीप फडतरे जखमी झाले. तसेच फिर्यादी व कंटेनर चालक महंमद सुलेमान जखमी झाले असून कारचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या अपघाताची माहिती सुपा पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.