पिंपरी पठार सेवा सोसायटी राष्ट्रवादीच्या ताब्यात आमदार निलेश लंके गटाचे एक हाती वर्चस्व काळ भैरवनाथ ग्रामविकास पॅनल १२/० ने विजयी पारनेर/प्र...
पिंपरी पठार सेवा सोसायटी राष्ट्रवादीच्या ताब्यात
आमदार निलेश लंके गटाचे एक हाती वर्चस्व
काळ भैरवनाथ ग्रामविकास पॅनल १२/० ने विजयी
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील पठार भागावरील पिंपरी पठार येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक एकूण १२ जागांसाठी लढवली गेली होती ही निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या विचारांच्या राष्ट्रवादी प्रणित काळ भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने १२/० ने विजय संपादन केला.
व विरोधी पॅनलला पराभवाची धूळ चारली काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनलने बी. टी. शिंदे, व्ही. जी. शिंदे, एस. एच. शिंदे, मा. उपसरपंच पोपट शिंदे, पोपट गुंजाळ, मा. सरपंच दत्तात्रय शिंदे, मा. सरपंच युवराज शिंदे, सरपंच सुनील पागिरे, उपसरपंच अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय सेवा सोसायटीत मिळवला. विजयी घोषणेनंतर गावातील ग्रामस्थांनी व विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला.
पिंपरी पठार सेवा सोसायटीच्या निवडणुकीतील काळभैरवनाथ पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - सर्वसाधारण : तिकोने रामदास सहादू, दाते पिराजी वामन, भोर दत्तात्रय विठोबा, शिंदे दत्तात्रय बाळासाहेब, शिंदे बाळशीराम पोपट, शिंदे रावसाहेब गोपाळा, शिंदे राहुल अंजाबापू, शिंदे संतोष कोंडीबा ओबीसी पुरुष : पागिरे खंडू गणपत, अ.जाती : गायकवाड सुनील दादू महिला : शिंदे छबूबाई पांडुरंग, शिंदे शोभा अशोक विजया नंतर पिंपरी पठार येथे विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या सर्व उमेदवारांनी व समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.