अहंकाराने माणस लयाला गेली - हभप . सुधाकर आहेर पारनेर / प्रतिनिधी ( संजय मोरे ) समाजात जीवन जगताना माणुस स्वार्थ आणि मोठेपणा मिळाविण्या साठी...
अहंकाराने माणस लयाला गेली - हभप . सुधाकर आहेर
पारनेर / प्रतिनिधी ( संजय मोरे )
समाजात जीवन जगताना माणुस स्वार्थ आणि मोठेपणा मिळाविण्या साठी अधर्म काम करू लागला आणि अहंकारामुळेच समाज लयाला गेला . असे प्रतिपादन हभप . सुधाकर महाराज आहेर( भातकुडगाव ता . नेवासा) यानी केले .
पारनेर कान्हुर पठार रोडवरील गणपती चौफुला विरोली ता .पारनेर येथील गणपती मंदिरात अयोजीत केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे किर्तनमालेतील तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. सप्ताहाचे हे ३३वे वर्ष आहे .
हभप . आहेर पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्राची भुमीही संताची भुमी आहे या भूमीने जगाला हेवा वाटावा असे महान महात्मे दिले . शिवरायासारखे सुपुत्र दिलेे तुकाराम महाराजा सारखे जगत गुरु दिले ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाची माऊली झाले त्यांची किर्ती जगात महान आहे अशा भुमीत आपल्याला जन्म मिळाला आपण भाग्यवान आहोत . या महापुरुषाचा आदर्श आपण आपल्या संसारात आणला पाहीजे आपल्या मुलांवर चांगल संस्कार केले तर भारताचा एक आदर्श नागरिक घडवता येईल .
आधात्मामुळे समाजात एकोपा निर्माण होतो हभप नाना महाराज वनकुटेकरांमुळे महाराष्ट्राला एक वैभवशाली किर्तनकार मिळाल्याचे समाधान आणी आदर्श वाटतो असे गौरव उद्गगार सुधाकर महाराज यानी काढले .एक आदर्श समाज निर्मिती साठी मुलांना योग्य शिक्षण द्या घरातुनच चांगल्या संस्काराची शिदोरी द्या म्हणजे तो समाजात ताठ मानेने उभा राहील .
आईवडिलांचा सांभाळ करा व्यसनापासुन दुर रहा गावाचा भावाचा मोठयाचा सन्मान करायला शिका जीवनात मान अपमान पचवायला शिका जीवन कृतार्थ होईल असे ही आहेर महाराज समारोप प्रसंगी म्हणाले पत्रकार संजय मोरे यानी उपस्थिताचे आभार मानले हभप पंढरीनाथ महाराज भागवत प्रकाश महाराज गाडेकर यांनी गायनातुन उत्कृष्ठ साथ दिली