तातडीने पाणी सोडा अन्यथा तीव्र आंदोलन निघोज परिसरातील ग्रामस्थांचे निवेदन पारनेर/प्रतिनिधी : आज कुकडी कालवा लाभ क्षेत्रातील शेतकरी नी पा...
तातडीने पाणी सोडा अन्यथा तीव्र आंदोलन
निघोज परिसरातील ग्रामस्थांचे निवेदन
पारनेर/प्रतिनिधी :
आज कुकडी कालवा लाभ क्षेत्रातील शेतकरी नी पाणी प्रश्नाबाबत नारायण गाव येथे निवेदन देउन तातडीने पाणी सोडणेबाबत मागणी केली आहे. जर पाणी २-३ दिवसांत आले नाही तर मात्र शेतीमाल शेतातच जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच शिवबा संघटनेने केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत आज मोठ्या प्रमाणावर शिवबा संघटना सहकारी नारायण गाव येथे उपस्थित होते.
यावेळी शिवबा संघटना, संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन, पठारवाडी ग्रामस्थ, जवळा ग्रामस्थ, वाघजाई पाणी वापर संस्था क्र ६३,भैरवनाथ पाणी वापर संस्था क्र ६४, आदिच्या वतीने निवेदन कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. दिनांक ८ तारखेपासून उपोषण ९ तारखेस बंद पाळून या निर्णयाचा निषेध करण्यात येणार आहे. तरीही निर्णय न घेतल्यास निघोज बसस्थानकावर रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यानी दिली.
यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, सचिन पाटील वराळ,विश्वनाथदादा कोरडे,डॉ भास्कर शिरोळे,किसन सुपेकर,बाबाजी तनपुरे,शंकर पाटील वरखडे,रोहिदास लामखडे, एकनाथ शेटे,विठ्ठल लामखडे,खंडु घुले,निलेश लामखडे,मनोहर राऊत,गणेश लंके,माऊली लामखडे,बाबाजी लामखडे,रवींद्र वरखडे, शांताराम लामखडे,प्रतिक वरखडे,सुनील शेटे व अनेक सहकारी उपस्थित होते.