भाळवणी ग्रामीण पतसंस्थेत चोरीचा प्रयत्न फसला महाविद्यालयाचे कुलपेही तोडली गस्त वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी पारनेर प्रतिनिधी : भाळवणी परि...
भाळवणी ग्रामीण पतसंस्थेत चोरीचा प्रयत्न फसला
महाविद्यालयाचे कुलपेही तोडली गस्त वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी
भाळवणी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून भर बाजारतळावर असणाऱ्या भाळवणी ग्रामीण पतसंस्थेचे शटर तोडून आत शिरण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला मात्र, परंतु संस्थेची तिजोरी फोडण्यात त्यांना अपयश आले. संस्थेचे कोणतेही नुकसान झाले नाही. तो पर्यंत शेजारी जागे झाले होते त्यामुळे चोरांनी त्याठिकाणावरून पळ काढला.
व भाळवणी ग्रामीण पतसंस्थेच्या शेजारीच ठकाजी शिंदे यांच्या मालकिचे असणारे सुखकर्ता मेडीकल व जनरल स्टोअर्स हे दुकान फोडण्याचाही चोरटयांचा प्रयत्नही अयशस्वीच झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील अक्षय साठे यांचे मातोश्री ट्रेडर्स है दुकान चोरट्यांनी फोडले असून त्यातून चाळीस हजार रोख स्वरुपात चोरट्यांनी लांबविले. तसेच महात्मा फुले विद्यालयाचे कुलपे चोरट्यांनी तोडले असून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झालेले आहेत.
भरवस्तीत चोरट्यांनी घातलेल्या धुमाकूळमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात पारनेर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा व नियमित गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
COMMENTS