जागतिक महिला दिन विशेष... पारनेरची संघर्षकन्या कु. राजेश्वरी कोठावळे पारनेर तालुक्याचे कर्तृत्ववान युवती नेतृत्व पारनेर प्रतिनिधी : राजकीय प...
जागतिक महिला दिन विशेष...
पारनेरची संघर्षकन्या कु. राजेश्वरी कोठावळे
पारनेर तालुक्याचे कर्तृत्ववान युवती नेतृत्व
पारनेर प्रतिनिधी :
राजकीय पटलावर आपल्या अस्तित्वाची ओळख करून देणारी सामाजिक व वैचारिक बैठक असलेली कार्यकर्तृत्व संपन्न संस्कारक्षम महाराष्ट्रातील तमाम युवा वर्गाची प्रेरणास्रोत आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून समाज मनावर अधिराज्य गाजवत असलेली पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथील युवतींचे बुलंद नेतृत्व अहमदनगर राष्ट्रवादी युवती कांग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे. या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत व संघर्षांचा अतिशय खडतर प्रवास करत समाजाच्या विचारांची आणि मानसिकतेची चौकट झुगारून देत. आपल्या समाजातील दीन-दलित दुर्बल घटकांसाठी कार्य करत आहेत. सामाजिक भान ठेवून नेहमीच समाज कार्यामध्ये झोकून दिलेल्या राजेश्वरीताई या आज महाराष्ट्रातील तमाम युवतींसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत. पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्रात चालवणारे देशाचे कृषि नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांना आदर्श मानून नेहमीच समाज हितासाठी राजेश्वरीताई काम करत आहेत.
पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन काम करणाऱ्या राजेश्वरीताई कोठावळे यांनी समाजातील महिला व युवतींसाठी नेहमीच पुढे येत त्यांच्यासाठी त्या रक्षणाची ढाल बनून उभ्या आहेत. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचारप्रेरणेने काम करत व ते विचार आत्मसात करत समाज हितासाठी राजेश्वरी ताई कोठावळे या काम करत आहेत.
पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील सांगवी सूर्या येथील कोठावळे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत आपल्या समाज कार्याने अवघ्या वयाच्या २२ वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ओळख तयार केलेल्या मूळ एक खेळाडू असलेल्या राजेश्वरी' ताई कोठावळे जुदो, कराटे, पंच बॉक्सिंग, कुस्ती, कबड्डी, खो-खो, तलवार व लाठी चालवणे या मैदानी खेळांमध्ये पारंगत आहेत तसेच त्यांनी या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये पंच म्हणूनही काम पाहिले आहे. त्या एक उत्तम आदर्श योगप्रशिक्षक असून योगाचा त्यांचा सविस्तर अभ्यास आहे. त्यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले असून महिलांसाठी त्या नेहमीच समाजहिताचे कार्य करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी दहा हजार महिलांना व युवतींना मोफत स्वयं संरक्षणाचे धडे देत प्रशिक्षित केले आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये मोफत योग शिविर घेऊन समाजाला आरोग्यविषयक योगाचे महत्त्व पटवून देत आहेत. महिलांना एकत्र करत सार्वजनिक गणेशजयंती, शिवजयंती-भीम जयंती उत्सव साजरा करणे, पोलीस बांधवान सोबत भाऊबीज साजरी करणे, समाजातील दीनदलित दुर्बल आदिवासी दिव्यांग घटकातील मुलांना शालेय साहित्य कपडे, खाऊ वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
तसेच महिलांवर समाजात होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा व त्यासाठी मोर्चे, आंदोलने करत शासन दरबारी न्याय मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. हाथरस पीडित तरुणीला व कोपर्डी येथील भगिनीला न्याय मिळावा यासाठी रस्ता रोको आंदोलन करून महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या समस्यांकडे राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले तसेच शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव भेटला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, माझा शेतकरी बळीराजा वाचला पाहिजे, ही भूमिका मनात ठेवून शेतकरी संप, शेतकऱ्यांचे आंदोलने मोर्चे यामध्ये सहभागी होत व आपली भूमिका माध्यमांसमोर मांडत नेहमी आवाज उठविला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्यांना शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला व तो आजही करत आहेत. शांत, दयावान, सुस्वभावी, सामंजस्य, तितक्याच करारी धाडसी संस्कारक्षम, समाजशील, विचारशील, सुसंस्कृत, आक्रमक अशा अष्टपैलू असलेल्या पुरोगामी विचारांच्या राजेश्वरीताई कोठावळे आपल्या कार्याने समाज मनाचा मानबिंदू बनल्या आहेत. युवतींच महिलांचं सामाजिक नेतृत्व स्वीकारून त्या राजकारणात आणि समाजकारणात काम करत आहेत.
राजकारणातही शंभर टक्के समाजकारण ही निती त्यांनी अंगीकारली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्रात आजही जिवंत ठेवणारे महाराष्ट्राचे भूषण देशाचे कृषि नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सक्षणा ताई सलगर, आमदार रोहित 'दादा पवार, लोकनेते आमदार निलेशदादा लंके साहेब यांनी पारनेर तालुक्या सारख्या दुष्काळी भागातून आलेल्या आणि आपल्या समाज कार्याने प्रेरित केलेल्या राजेश्वरी ताई कोठावळे यांना अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली.. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पक्षाने युवती नेतृत्वाचा एक प्रकारे सन्मानच केला. कोरोनाच्या जागतिक संकटातून सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी ही संघर्षकन्या रणरागिनी मैदानात उतरली व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी झोकून देऊन काम करू लागली.
पारनेरचे आमदार लोकनेते निलेशदादा लंके साहेब यांनी कोरोना काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठे पहिल्या व दुसऱ्या लाटेत १००० बेडचे श्री शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर कोरोना सेंटर पारनेर तालुक्या सारख्या ग्रामीण भागात सुरू करून कोरोनाग्रस्त रुग्णांना आधार देण्याचं काम केले आमदार लंके यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबर या कोरोना काळात राजेश्वरीताई कोठावळे यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांची आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा केली. या कोरोनाच्या काळात राजेश्वरी ताई कोठावळे यांनी कोरोना सेंटर मध्ये २४ तास थांबून मानसिक संतुलन खऱ्या अर्थाने चांगले राहण्यासाठी प्रयत्न केले त्या कोविड सेंटर मध्ये दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत रुग्णांसाठी योगासने, कवायती, हास्यक्लब, घेत होत्या.
तसेच त्या ठिकाणी दुपारच्या वेळेत पारंपारिक खेळ संगीत खुर्ची हा लहान मुलांसाठी घेतला गेला व दररोज लहान मुलांना खाऊ वाटप करणे कोरोनाग्रस्त महिलांसोबत चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे तसेच त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय महिला कर्मचाऱ्यांसोबत राहून कोरोना ग्रस्तांसाठी काम करत होत्या त्यांनी कोविड सेंटर मध्ये विविध सण, उत्सव साजरे केले. वटसावित्री पौर्णिमा त्यांनी महिलांसोबत साजरी केली व महिलांच्या चेहऱ्यावर कोरोना काळातही आनंद निर्माण केला. तसेच कोरोनाग्रस्तांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी महाराष्ट्राचा लावणीसम्राट किरणकुमार कोरे यांना आमंत्रित करत जागर लोककलेचा हा सामाजिक मनोरंजनात्मक कार्यक्रम कोविड सेंटरमध्ये घेतला त्यांच्या या कार्याचे समाजातून कौतुक झाले. आपल्या जीवनात राजेश्वरी ताई ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, सिंधुताई सपकाळ, बाबा आमटे यांना आपल्या प्रेरणास्त्रोत मानतात आतापर्यंतच्या या सर्व प्रवासात त्यांना आपले आई-वडील, भाऊ, नातेवाईक मित्रपरिवार व विशेष करून पारनेरचे आमदार निलेशदादा लंके व सौ राणीताई निलेश लंके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे व त्यांच्या या सर्व कार्यामध्ये यांचा त्यांना पाठिंबा आहे. राजेश्वरीताई कोठावळे बोलताना नेहमी म्हणतात की समाजात काम करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही सामाजिक भावना नेहमी मनात असावी त्यासाठी समाजहिताचे काम करत राहणे गरजेचे आहे. सामाजिक विचार नेहमी जागृत ठेवला पाहिजे.
यापुढील काळात अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी ताई कोठावळे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाच्या हातून समाजाची सेवा पडावी राजकारण करत असताना सामाजिक काम उभे राहावे समाज हितासाठी नेहमी त्यांनी कार्य करत राहावे. आपले ध्येयधोरणे नेहमी युवा पिढीच्या कल्याणासाठी राबवावित सर्वगुणसंपन्न, सुसंस्कृत, अष्टपैलू व्यक्तिमत्व, लोकभिमुख नेतृत्व असलेल्या अहमदनगर राष्ट्रवादी युवती अध्यक्षा राजेश्वरी ताई कोठावळे या खासदार सुप्रियाताई सुळे व पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते आमदार निलेशदादा संके यांना आपल्या मार्गदर्शक प्रेरणास्थान मानतात त्यांच्या विचार प्रेरणेने त्यांनी सामाजिक कामात स्वतःला झोकून दिले आहे. भविष्यात राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करून युवा पिढी समोर एक आदर्श राजकारण करण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (पंचायत समिती, जिल्हा परिषद व बाजार समिती) निवडणुकीत पक्षश्रेष्ठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन नक्कीच समाजाची सेवा करण्याची संधी देतील. राजेश्वरी ताई कोठावळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख असाच उंचावत राहावा त्यांच्या कडून नेहमी संस्कारक्षम सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन व्हावे त्यामाध्यमातून समाजातील प्रश्नांसाठी व समस्यांसाठी व समाजाच्या हितासाठी काम करावे अशा या समाज हिताचे रक्षण करणाऱ्या तरुण युवती नेतृत्वाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
..